हिंगणघाट कामगारांना वीणा सुरक्षा साधनाने कराव लागत आहे काम*

48

*हिंगणघाट कामगारांना वीणा सुरक्षा साधनाने कराव लागत आहे काम*

*मुकेश चौधरी प्रतिनिधि*
हिंगणघाट:- शहरातील नांदगाव चौकात राष्ट्रीय महामार्ग 7 वर माघिल 2 वर्षा पासुन ओवर ब्रीज उद्दाणपुलाच बांधकाम सुरु आहे. बांधण्यात करण्यात येत असलेल्या ओवर ब्रीज उद्दाणपुलावर एका
उद्दाणपुलाचे बांधकाम करना-या कामगाराचा ऐक्सीडेंट झाला होता. त्यांत तो गंभीररित्या जखमी झाला. त्यामूळे पुन्हा कामगाराचा सुरक्षेचा सेफ्टीच्या मुद्दा एरेनीवर आला.
हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्गावर ओवर ब्रीज उद्दाणपुल बांधकाम करण्याचा ठेका दिल्ली येथिल वी. आय. पी. एल विध्या इन्फ्रा प्रा. लिमिटेड दिल्ली या कंपनी ला देण्यात आला. त्या कंपनी ने हिंगणघाट येथील स्थानिक ठेकेदार मदनकार याला फुल बांधकामाचा ठेका दिला. आणी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणुन मुखर्जी यांची तेथे निवृत्ती केली.

*कामगार सुरक्षा साधनाचे कुणी खाल्ले पैसे*
पण केंद्र शासनाने कामगाराच्या सुरक्षा करिता आखून दिलेले दिशा निर्देशाची विध्या इन्फ्रा प्रा. लिमिटेड दिल्ली या कंपनी तर्फे पायमल्ली करण्यात येत आहे. या कंपनी द्वारा कामगारांना कुठलीही सेफ्टी गार्ड सुरक्षा साधन देण्यात आलेली नाही. कामगारांना आपला जीव धोक्यात घालुन काम कराव लागत आहे. 22 सप्टेंबर एका कामगारांचा ऐक्सीडेंट झाला त्याला गंभीर परिस्थिती मध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अजुन पण तो कामगार रुग्णालयात जिवन आणी मृत्युशी झुंज देत आहे. सुरक्षा साधनाचे पैसे खाल्ले कुणी हा प्रश्न हिंगणघाट येथील काही समाजिक कार्यकर्ते विचारत आहे. कधी पर्यंत या कामगारांना आपला जीव धोक्यात घालुन काम कराव लागेल.

*मिडिया वार्ता न्यूजला कामगारांनी आपली आपबीती सांगीतली*
आम्हाला स्थानिक ठेकेदार मदनकार आणी प्रोजेक्ट मॅनेजर ने कुठलेही सुरक्षा साधन दिलेली नाही. आम्ही आम्हचा जीव धोक्याच घालुन येथे काम करत आहोत. 22 सप्टेंबर आम्हचा एका कामगार भावाचा वीणा सुरक्षा साधना अभावी ऐक्सीडेंट झाला आणी आज तो जीवन मरणाशी झुंज देत आहे.