कृषिदुताकडून एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन
बोंडआळी नियंत्रणासाठी कामगंध सापळे बद्दल प्रशिक्षण देताना कृषिदूत प्रतीक भास्कर बोकडे

बोंडआळी नियंत्रणासाठी कामगंध सापळे बद्दल प्रशिक्षण देताना कृषिदूत प्रतीक भास्कर बोकडे
प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
समुद्रपूर येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूत प्रतीक भास्करराव बोकडे यांनी समुद्रपूर लगत बर्फा गावी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले
कृषीदूताने मार्गदर्शनात गुलाबी बोंड अळी चा प्रसार रोखण्यासाठी हंगामात कपाशीची लागवड महत्त्वाची आहे पूर्वहंगामी लागवड केल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो तसेच मुख्य प्लॉटच्या चारी बाजूनी नॉन बीटी कपाशीची लागवड करावी त्याचबरोबर कुठेकुठे एरंडी झेंडू सापळापीकाची पिकाची लागवड करावी वाढीच्या अवस्थेमध्ये पाते लागायला सुरूवात होत असतात ती एकरी पाच याप्रमाणे गुलाबी बोंड अळीचे कामगंध सापळे लावावेत दोन सापला मधील अंतर पन्नास मीटर असावे व त्याच झिग-झाग पद्धतीने लावावेत आर्थिक नुकसान पातळी लक्षात ओळखून शिफारशीत कीटकनाशकाची फवारणी करावी फवारणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
कार्यक्रमामध्ये उपस्थित शेतकरी भास्कर बोकडे,अशोक तुरणकार, नंदकिशोर पाल ,सरपंच शेषराव तुरणकार,चंद्रभान जामूनकर इत्यादी उपस्थित होते
तसेच या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.इस्माईल सर ,कार्यक्रम समन्वयक डॉ. कांबळे सर डॉ.आर कदम सर डॉ. पी कापसे सर कार्यक्रम अधिकारी डॉ.आर सी सावंत सर कीटकशास्त्रज्ञ डॉ.पी झानवार
सर यांचे मार्गदर्शन लाभले.