29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस, घ्या काळजी आपल्या हृदयाची.
✒प्रशांत जगताप,प्रतिनिधी ✒
मो. न. 9766445348
ह्रदय म्हटलं की, धगधगणार काळीज, हृदयावर अनेक लेखक, कवी यांनी कविता, लेख, कथा लिहण्यात आल्या प्रेमी युगलासाठी तर हृदय हे महत्वाचे स्थान. प्रेमाची व्याख्या हे हृदया शिवाय अधुरी असते. म्हणुन हृदय हे मानवी जीवनात किती मुल्यवान अंग आहे. स्वस्थ हृदय असने किती मुल्यवान आहे यावरुन ठरते. हृदयवीणा मनुष्य पाला पाचोळा आहे.
आपल हृदय म्हणजेच दिल एक मस्कुलर अंग आहे, जे 24 तासात एक दिवसात 1 लक्ष वेळा धड़कत असते. आपल हृदय छातीच्या उजवीकडचा बाजुला असते. जे कि 24 तासात पुर्ण शरीरामध्ये 5000 गैलन रक्त पंप करते. हृदयाचे मुख्य कार्य आपल्या शरीरातील टिश्यू ला ऑक्सीजन आणि पोषक द्रव्य पोहचवण्याचे काम करत असते. ह्रदय हे शरीरातील कार्बन डाइऑक्साइड आणि अनेक दूषित गोष्टी पासुन मुक्तीसाठी मदद करत असते.
आज जागतिकरणाच्या या उभ्या जगात हृदया संबंधित आजार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे अनेक घटने वरुन समोर येत आहे. त्यामूळे हृदय विकारा संबंधित जनजागृती करण्याचा ऊद्देशाने 29 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक हृदय दिन म्हणुन संपुर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. जागतिक हृदय दिवस निमीत्त आयोजित उपक्रमामध्ये हृदयविकाराचे प्रतिबंधात्मक उपाय आणि या विकाराचा जागतिक पातळीवर होणारा परिणाम यांचा समावेश होतो.
जगात ह्रदया संबंधात घटना वाढत असल्याने जनजागृती करण्यासाठी एक सक्षम अशा जागतिक संघटनेची गरज भासू लागली त्यातून जागतिक हृदय संघटनेची स्थापना करण्यात आली. आणि त्यांतून जागतिक हृदय संघटना आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवसाला 1999 ला मान्यता मिळाली.
जागतिक लेवलवर ह्रदय सबंधात जनजागृतीच्या उपक्रमाच्या सुरुवातीला सप्टेंबर महिन्यातील अखेरचा रविवार हा जागतिक हृदय दिवस म्हणून ठरवण्यात आला. त्यानुसार 24 सप्टेंबर 2000 साली पहिला जागतिक हृदय दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर 2001 पासून 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.
जागतिक आकडेवारीनुसार हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारणापैकी एक आहे. अधिकतर व्यक्ती हे हृदयविकाराचा झटका आल्याने मरण पावतात. असंतुलित आहार, व्यायामाची कमतरता, धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हवाप्रदूषण ही हृदयविकाराची महत्त्वाची कारणे आहेत. हृदय विकारासंबंधित माहिती तसेच प्रतिबंधात्मक उपाय यांबद्दल चर्चा, फलक किंवा माहिती पत्रिका यांद्वारे 29 सप्टेंबर या दिवशी जनजागृती केली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन संस्था आणि वैद्यकीय समूहांद्वारे शास्त्रीय बैठक आणि चर्चा आयोजित केल्या जातात. तसेच जागतिक हृदय दिवसानिमित्त शैक्षणिक कार्यक्रम आणि आरोग्य शिबिरे घेतली जातात. संतुलित आहार, व्यायाम यांद्वारे हृदयविकाराला प्रतिबंध होऊ शकतो, याबाबत माहिती दिली जाते.
प्रत्येक वर्षी जागतिक हृदय संघटनेद्वारे कार्यक्रमाची रूपरेखा उद्धृत केली जाते. प्रथम वर्षी शारीरिक सक्रियता या रूपरेषेला अनुसरून जनसामान्यांमध्ये माहितीचा प्रसार करण्यात आला. 2003 मध्ये ‘स्त्री आणि हृदयविकार’ ही रूपरेषा ठरवण्यात आली. याद्वारे स्त्रियांमध्ये उद्भवणाऱ्या हृदयविकाराची कारणमीमांसा आणि उपचार यांबाबत माहिती देण्यात आली. 2008 मध्ये ‘हृदयविकाराची शक्यता’ याचे मोजमापन करण्याबाबत रूपरेषा आखण्यात आली. याद्वारे व्यक्तिसापेक्ष हृदयविकार होण्याच्या संभावनांचे मूल्यमापन करण्यात आले. 2019 मध्ये स्वत:च्या आणि इतरांच्या हृदयाची काळजी घेण्याबाबत “माझ ह्रदय तुझ ह्रदय” ही रूपरेषा योजण्यात आली. अशा पद्धतीने संतुलित वजन, निरोगी हृदयासाठी आवश्यक जीवनशैली तसेच व्यवसायाच्या ठिकाणी हृदय निरोगी राखण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती अशा अनेक महत्त्वपूर्ण रूपारेखांना वाहिलेले कार्यक्रम देखील जागतिक हृदय दिवस या दिवसाच्या निमित्ताने आखण्यात येतात.