नेफडो नागपूर विभाग अध्यक्ष व राष्ट्रीय सल्लागार यांना वृक्षारोपण करून वाहिली श्रद्धांजली.

48

संतोष मेश्राम✍

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

( ग्रामीण )-9923497800

राजुरा ,सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की

स्व. प्रोफेसर बहेकार , नागपूर विभाग अध्यक्ष नेफडो यांचे दिनांक 15/9/21 ला अपघाती निधन झाले. ते भंडारा जिल्ह्यातील साकोली या गावी राहत होते. तसेच राष्ट्रीय सल्लागार व महाराष्ट्र पर्यटन व कला महोत्सव समितीचे अध्यक्ष स्व. शेख जाकीर हुसेन यांचे दिनांक 25/9/21 ला हृदय विकाराने निधन झाले. या दोन्ही मान्यवरांना  श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजुरा तालुका नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने राजुरा येथे आदर्श शाळेकडील परिसरात, रेल्वे क्रॉसिंग जवळ वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नागपूर विभाग सचिव बादल बेले, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विजयकुमार जांभुळकर, राजुरा तालुका महिला अध्यक्षा अल्का सदावर्ते, तालुका अध्यक्ष संतोष देरकर, उपाध्यक्ष रजनी शर्मा, दिलीप सदावर्ते, शहर अध्यक्ष संदीप आदे, तालुका संघटक मनोज तेलीवार, शहर संघटिका, उज्वला जयपूरकर, ललिता खंडाळे, मोहनदास मेश्राम आदींची उपस्थिती होती. यावेळी सर्वांनी दोन मिनिटाचे मौन धारण केले. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था नागपूर विभागातील संपूर्ण सहा जिल्हे चंद्रपूर,  गडचिरोली, वर्धा, भंडारा,  गोंदिया, नागपूर या ठिकाणी जिल्हा व तालुका स्तरावर एकाच दिवशी वृक्षारोपण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.