पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा

53

पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा

पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा
पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा दौरा

साहिल महाजन✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
93097 47836
यवतमाळ दि. 29 सप्टेंबर : राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे दिनांक 30 सप्टेंबर पासून यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार, दि. 30 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 5.15 वा. शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे नागपूरहून आगमन, राखीव व मुक्काम.
शुक्रवार दि. 1 ऑक्टोबर 2021 रोजी स.11 वा. यवतमाळ जिल्ह्यातील खासदार व आमदार यांच्या समवेत शासकीय विश्रामगृह येथे चर्चा. दु. 12 वा. खनिज विकास प्रतिष्ठान बैठकीस विश्रामगृह येथे उपस्थिती. दु. 1 ते 2 शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दु. 2 वा. यवतमाळ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस नियोजन सभागृह येथे उपस्थिती. रात्री यवतमाळ येथे मुक्काम.
शनिवार दि. 2 ऑक्टोबर 2021 रोजी स. 9.30 वा. आ. दुष्यंत चतुर्वेदी यांच्या स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करण्यात आलेल्या रुग्णवाहीकेचे लोकार्पण. स. 10 वा. प्रभाग क्र. 3 येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन. स.10.30 वा. प्रभाग क्र. 7 येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थितीत. स. 11 वा. नेहरू बाल उद्यान आझाद मैदान यवतमाळ येथे यवतमाळ तारांगणाचे लोकार्पण व नगर परिषद यवतमाळ च्या प्रशासकीय इमारतीवर बसविण्यात आलेल्या सौर उर्जा पॅनलचे उद्घाटन दु. 12.30 वा. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगर परिषद यवतमाळ मार्फत उभारण्यात आलेल्या बायोमायनिंग घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे सावरगड येथे उद्घाटन. दु. 1 ते 2 शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दु. 2 वा. यवतमाळ वाढीव पाणी पुरवठा योजना आढावा बैठकीस शासकीय विश्रामगृह येथे उपस्थिती. दु. 3 वा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा संघर्ष समिती, उमरखेड येथील स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समवेत शासकीय विश्रामगृह येथे चर्चा. सायं. 4 वा. यवतमाळ येथून नागपूरकडे प्रयाण.