प्रशासनाच्या हलगर्जी कारभार, शेतकर्‍याच्या शेतात पावसाचे गुडघाभर पाणी.

47

प्रशासनाच्या हलगर्जी कारभार, शेतकर्‍याच्या शेतात पावसाचे गुडघाभर पाणी.

प्रशासनाच्या हलगर्जी कारभार, शेतकर्‍याच्या शेतात पावसाचे गुडघाभर पाणी.
प्रशासनाच्या हलगर्जी कारभार, शेतकर्‍याच्या शेतात पावसाचे गुडघाभर पाणी.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
मोवाड,दि.28 सप्टेंबर:- एखाद्या गरीब व अल्पभुधारक शेतकर्‍याच्या पाठीशी कुणीही नसाव तो सतत अस्मानी व सुल्तानी संकटाचा सामना करीत शेत पिकविण्यासाठी कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन आपला व प्रपंच्याचा ऊदरनिर्वाह करण्यातच आयुष्य घालवीत असेल, त्याला कुणीही मदत करायला तयार नसेल तर यापेक्षा मोठी शोकांतीका काेणती म्हणावी हे एक दुर्भाग्यच समजाव अस म्हणायला हरकत नाही. असाच एक प्रकार वाढोणा या गावातील एका शेतकर्‍यासोबत घडत आहे. राजेंद्र भिमराव बोडखे असे या दुर्देवि शेतकर्‍याचे नाव आहे.

राजेंद्र बोडखेचे मौजा वाढोणा येथे शेत सर्वे कं 24 ही शेतजमीन आहे. त्यांचा शेती हा केवळ एकमेव व्यवसाय आहे. सततची नापीकी व अवेळी येणार्‍या पावसाने ते ग्रासले आहेत. त्यांनी कर्ज काढुन शेत पेरणी व दोन मुलींचे लग्ण केले. सध्या त्यांचेवर बैंकेचे व इतर देनदारांचे कर्ज डोक्यावर असल्याचे कळले. पावसाळ्याच्या दिवसात ऊभ्या पिकात पावसाचे गुडघाभर पाणी राहत असल्याने त्यांनी अनेकदा याची माहीती संबंधीत अधिकार्‍यांना वेळोवेळी दीली परंतु केवळ कागदांच्या घोड्यातच ते अडकले असुन अद्यापपर्यंत कोणताही राजकीय पुढारी व शासकीय अधिकार्‍यांचे पाय त्यांचे शेतीच्या बांधावर लागले नसल्याने ते आता वैतागले आहेत. याची माहीती घेतली असता त्यांच्या शेतीशेजारी असलेला नाला बाजुच्या शेतकर्‍याने खोदुन तो पुर्णता बुजवील्यामुळे पावसाचे पाणी त्यांचे शेतात गुडघाभर जमा असल्याचे निदर्शनात आले. हा प्रकार जवळपास सतत तिन वर्षापासुन सुरू असुन त्याबद्दल त्यांनी अनेकदा शासनाच्या निदर्शनात आणुन देण्याचा प्रयत्न केला व शेजारील बुजविलेला नाला खुला करून देण्यात येण्यासंदर्भात सबंधीत अधिकार्‍यांना मिळेल त्या माध्यमाद्वारे लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रकाराकडे अद्यापपर्यंत कुणीही लक्ष पुरवीले नसल्याने या गंभीर बाबीकडे कुणी राजकीय दबावतंत्राचा वापर तर करीत नसेल ना याबाबत गावात शंका व्यक्त करण्यात येत आहे.

हल्ली राजेंद्र बोडखेच्या शेतात कपाशी व तुरीच्या ऊभ्या पिकात पावसाचे पाणी साचुन असल्याने ते सध्या मोठ्या मानसिक तनावात आहेत. यावर संबंधीत अधिकार्‍यांनी तातडीने चौकशी करून पाणी अडविणार्‍यावर कार्यवाही करून बुजविलेला नाला मोकळा करून द्यावा जेणेकरून साचलेले पावसाचे पाणी वाहुन जाण्यास सोयीस्कर होईल अशी मागणी करण्यात येत
आहे.