शिवनगर येथील मुख्य मार्गांची दुरुस्ती करा – आम आदमी पार्टीची मागणी*

58

*शिवनगर येथील मुख्य मार्गांची दुरुस्ती करा – आम आदमी पार्टीची मागणी*

शिवनगर येथील मुख्य मार्गांची दुरुस्ती करा - आम आदमी पार्टीची मागणी*
शिवनगर येथील मुख्य मार्गांची दुरुस्ती करा – आम आदमी पार्टीची मागणी*

पंकज रामटेके
घुग्घुस प्रतिनिधी
मो.८४८४९८८३५५
घुग्घुस शहरातील शिव नगर वार्ड क्रमांक ०५ इथे जाणारा मुख्य मार्ग पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना त्या मार्गाने ये जा करताना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे तिथे अपघात होण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. तरी सुद्धा नगर परिषद प्रशासन सुस्त बसलेली आहे हे सर्व आम आदमी पार्टी घुग्घुस च्या लक्षात येताच त्यांनी नगरपरिषद मुख्य अधिकारी अर्शीया जुही यांच्या कडे तत्काळ रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली.
त्यावेळी शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सह सचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, सागर बिऱ्हाडे, प्रशांत सेनानी,संदीप पथाडे, रवी शांतलावार,अभिषेक तालापेल्ली, सोनू शेत्तियार, दिनेश पिंपलकर, संतोष सलामे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.