पारोळा तालुका ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ सरसकट मदत द्या.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट पारोळा तहसीलदार यांना निवेदन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट पारोळा तहसीलदार यांना निवेदन
मीडिया वार्ता न्युज
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
विशाल सुरवाडे
जळगाव:- पारोळा तालुक्यातील तसेच मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यiचे हातातोंडाशी आलेले पीक पूर्णतः वाया गेले आहे. त्यासाठी केलेला पूर्ण खर्च व मेहनत वाया गेली असून शेतकरी आणि त्यांचेवर अवलंबून असणारे सर्व लोक प्रचंड हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी लावलेल्या पिकपेऱ्यानुसार तात्काळ रोख स्वरूपाची मदत शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी तहसिलदार गावंडे यांना पारोळा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट वतीने जिल्हा अध्यक्ष आर टी सोनार तालुकाध्यक्ष दयाराम मोरे युवा अध्यक्ष योगेश महाले विधानसभा क्षेत्र प्रमुख राकेश जावरे भाऊसाहेब सोनवणे अमोल बिराडे राकेश कापडणे किरण वाघ मालोजी सूर्यवंशी सिद्धार्थ संदांशिव यांच्यानेतृत्वात निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्यात येऊन नुकसान भरपाई मिळणेकामी शासनाकडे तात्काळ मागणी करण्यात यावी. यापूर्वी झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या भरपाईची मदतही तात्काळ मिळावी. तसेच तालुक्यात झालेल्या रस्ता निर्मितीमुळे संबंधित विभागाने सांडवा न काढल्याने शेकडो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुढघाभर पाणी तुंबल्याने पूर्ण पिक वाया झाले असून शेतांचे अतोनात नुकसान झाल्याने त्यांचेही पंचनामे करण्यात यावेत. संबंधित मागण्यांचा योग्य विचार न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गटाचे जिल्हाध्यक्ष आर टी सोनार यांनी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल पुढील होणारे आंदोलनास प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने देण्यात आला आहे.