मालेगांव पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा. 33 जणांवर कारवाई, 138400 रूपयांचा मुद्देमाल जप्त

अजय उत्तम पडघान

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

मो: 8554920002

मालेगांव, 29 सप्टेंबर: मालेगाव शहरातील गांधीनगर परिसरात काल रात्री 10.30 ते 11.30 च्या दरम्यान दोन ठिकाणी सुरू असलेल्या अवैध जुगारावर मालेगाव पोलिसांनी छापा टाकून आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम, 52 पत्त्यांच्या गड्डया, मोबाईल असा एकूण एक लाख अडोतीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार मालेगांव पोलिस स्टेशन चे ठाणेदार किरण वानखेडे यांना मिळालेल्या गोपनीय व विश्वसनीय माहितीच्या आधारे त्यांच्या निर्देशानुसार काल 28 सप्टेंबर च्या रात्री साडे दहा ते अकरा वाजता दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी गव्हाणे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिपकुमार राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत वाढनकर, गजानन झगरे, नायब पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलिस कॉन्स्टेबल गजानन खंदारे यांच्या पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन मालेगांव शहरातील गांधीनगर परिसरात दोन ठिकाणी चालविण्यात येत असलेल्या अवैध जुगारावर छापा टाकून पहिल्या ठिकाणी 17 व दुसऱ्या ठिकाणी 16 लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून रोख रक्कम, 52 पत्त्यांच्या गड्डया व 21 मोबाईल असा एकूण एक लाख अडोतीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार राठोड यांनी सरकार पक्षातर्फे मालेगांव पोलिस स्टेशन मध्ये नोंदविलेल्या तक्रारीवरून पहिल्या प्रकरणात गुन्हा क्रमांक 397 / 2022 नोंदवून महाराष्ट्र जुगार बंदी कायद्याच्या कलम 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास ठाणेदार किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव भगत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर दुसऱ्या प्रकरणात गुन्हा क्रमांक 398 / 2022 नोंदवून महाराष्ट्र जुगार बंदी कायद्याच्या कलम 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल कैलास कोकाटे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here