आझाद मैदानात आजपासून दुष्काळग्रस्त भागातून एसटी महामंडळात भरती झालेल्या उमेदवारांचे आंदोलन 

तारा आत्राम

चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी

 मो: 9511620282

चंद्रपूर : तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दुष्काळग्रस्त भागातील तरुणांसाठी चालक वाहक या पदांसाठी सरळ सेवा भरती काढलेली होती, यात ३२०० जन सिलेक्ट झाले परंतु त्यांचे प्रशिक्षण सुरू होत नव्हते. तेंव्हा ऑल इंडिया पँथर सेनेने राज्यव्यापी आंदोलन उभारल्या नंतर हे प्रशिक्षण सुरू झाले होते. आज या सीलेक्शनला ३-४ वर्ष पूर्ण झाले, प्रशिक्षण होऊनही २ वर्ष उलटले तरीही या ३२०० जणांना सेवेत रुजू करण्यात आलेल नाही. या दरम्यानच्या काळात यातील ४-५ जणांनी आत्महत्या केली तरीही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही.

आंदोलनकर्त्यांची मागण्या:

तात्काळ एस टी महामंडळाने ३२०० प्रशिक्षणार्थी चालक वाहकांना नोकरीत रुजू करावे. 

सरळ सेवेतून भरती झालेल्यांना प्राधान्य द्या मगच कंत्राटी भरती करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here