शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत जिल्हयातील गडकिल्यांवरील स्वच्छता कार्यक्रम
✍️सचिन पवार ✍️
मीडिया वार्ता न्यूज
📞8080092301📞
रायगड :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळयानिमित्त रायगड जिल्हयातील एकूण 16 औ.प्र.संस्थांनी दिनांक 02 ऑक्टोबर, 2023 रोजी गड-किल्यांच्या स्वच्छतेच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्वच्छता कार्यक्रमाच्या आयोजनानुसार संबंधित संस्थेतील कर्मचारी व प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांमार्फत गडकिल्यांवरील स्वच्छतेचा कार्यक्रम राबविणार आहेत.
महाराष्ट्र म्हटलं कि प्रामुख्याने आठवण होते. ती महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची. छत्रपती शिवाजी महाराज यांनी घेतलेल्या स्वराज्याच्या शपथेची तसेच त्यांच्या शपथेच्या कार्यपूर्तीकरीता त्यांनी घेतलेल्या परिश्रमांची व शौर्याची. आपली शपथ पूर्ण करण्याकरीता त्यांनी निर्माण केलेल्या मराठा साम्राज्याची. याच मराठा साम्राज्याचा भाग म्हणजे अफाट, बेलाग आणि राकट असे गड-किल्ले. महाराजांनी गनिमांवर नियंत्रण ठेवण्याकरीता भुदुर्ग, वन दुर्ग, जलदुर्ग अशा वैभवशाली दुर्ग संपत्तीचे निर्माण केले. निरनिराळया किल्यांची गड किल्यांची निर्मिती केली.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळयास 350 वर्ष पुर्ण झाल्याने व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील 350 गड किल्यांची स्वच्छता करण्योच आवाहन केले आहे. त्याअनंषंगाने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग संचालक यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामार्फत गड-किल्ले स्वच्छता अभियान राबविण्याच्या सुचना दिल्या आहेत, असे उप प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण,संस्था-पनवेल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.