*माणगाव मध्ये बामणोली रोड येथे सद्गुरु पार्क च्या संरक्षण भिंतीचा काही भाग कोसलला आताची मोठी बातमी मीडिया वार्ता न्यूज च्या हाती…
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
कोकण :-माणगाव मध्ये बामनोली रोड येथे सद्गुरु पार्क बिल्डींग लगत असणाऱ्या संरक्षण भिंतीचा भाग कोसळला,रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे मुख्य ठिकाण माणगाव मधील बामनोली रोड येथील सद्गुरु पार्क बिल्डिंग लगतच्या संरक्षण भिंतीचा नदीच्या लगत भाग कोसळला त्यामुळे संरक्षण भिंतीला जवळच असणारी इमारत हिला धोका होऊ शकतो असं नाकारता येत नाही जो संरक्षण भाग कोसळला आहे त्या अंतरावर सी विंग इमारत उभी असून आणखीन काही इमारती या संरक्षण कट्ट्याच्या बाजूला उभ्या आहेत इमारतीच्या बाजूला पाण्याचा प्रवाह असून संरक्षण भिंत ही नदीच्या ब्रिजला जोडण्यात आली होती तेथील बिल्डरला संपर्क साधला असता त्याने सद्गुरु पार्क आणि माझा कोणताही संबंध नाही असे सांगितले संरक्षण भिंत कोसळली आहे ते काम जिल्हा परिषद म्हणजे झेड पीचे आहे किंवा सोसायटीने करून घ्यावं असं त्याने सांगितलं आमचे पत्रकारांनी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिले तेव्हा असा प्रश्न येतो की महाड काजळपुरा येथील पाच मजली इमारत कोसळली त्या प्रमाणे माणगांव मध्ये अशी दुर्घटना होऊ नये त्याआधीच संरक्षण कट्टा बांधणे योग्य आहे व स्थानिक प्रशासन माणगांव नगरपंचायत. ;वार्ड नगरसेवक यांनी यांनी लक्ष देऊन हा धोका टाळावा असे स्थानिकांचे म्हणणे आहे या घटनेबाबत प्रशासनाने तातडीने खबरदारी घ्यावी. असे सांगण्यात आले आहे.