संविधान सत्याग्रह यात्रेला आज पवित्र दीक्षाभूमीवरून प्रारंभ

5

संविधान सत्याग्रह यात्रेला आज पवित्र दीक्षाभूमीवरून प्रारंभ

✍🏻पूजा ढोके✍🏻
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मो. 9307374022

चंद्रपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की आज नागपूर येथे संविधान, लोकशाही व संवैधानिक संस्था वाचवण्यासाठी जनमानसाला जागृत करण्याच्या उद्देशाने काढण्यात येत असलेल्या संविधान सत्याग्रह यात्रेला आज (दि. 29 सप्टेंबर) पवित्र दीक्षाभूमीवरून प्रारंभ झाला.

महात्मा गांधी यांचे पणतू श्री. तुषार गांधी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात निघालेल्या पदयात्रेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती नाम करत सेवाग्रामकडे कूच केली. यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेस नेते सुनील केदार, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्यासह पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.