रायगड फोटो एक्स्पो संप्पन्न..

5

रायगड फोटो एक्स्पो संप्पन्न..

रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओ ग्राफर्स असोसिएशन च्या वतीनेआयोजन

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओ ग्राफर्स असोसिएशन च्या वतीने जिल्ह्यातील फोटोग्राफर्स ना नवीन तंत्रज्ञान अवगत व्हावे, फोटोग्राफी संदर्भात लागणाऱ्या वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने सलग दुसऱ्या वर्षी ‘रायगड फोटो एक्स्पो 25’ चे आयोजन करण्यात आले होते.
पेण येथिल मराठा समाज हॉल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या एक्स्पोचे उदघाट्न जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर जी. एस. हरळय्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, शिवसेनेचे तालुका प्रमुख समीर म्हात्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, पेण च्या माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी असोसिएशन चे संस्थापक विवेक सुभेकर, अध्यक्ष समीर भायदे, उपाध्यक्ष समीर मालोदे, सचिव आनंद नींबरे, सहसचिव दीपक बडगुजर, खजिनदार जितेंद्र मेहता, कार्यकारिणी सदस्य अविनाश राऊत, अनिरुद्ध जोशी, सुशिल घाटवळ, निलेश शिर्के, सल्लागार दादा आर्ते, एक्स्पो च्या आयोजनासाठी मेहनत घेणाऱ्या पेण फोटोग्राफर असोसिएशन चे अध्यक्ष समाधान पाटील, उपाध्यक्ष संदीप म्हात्रे, सर्व असोसिएशन चे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई, पुणे, ठाणे येथिल निकॉन, कॅनॉन, फ्युजिफिल्म, रॉयल अल्बम, प्रिंटर, फ्रेम्स, बेबी शूट क्रॉप्स, थ्रीडी बॅग्राऊंड अशा फोटोग्राफी संदर्भात विविध प्रकारचे 18 स्टॉल उपलब्ध करण्यात आले होते.
या एक्स्पोचे खास आकर्षण म्हणून रायगड फोटो सुदंरी नावाने फॅशन शोचे देखील आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ छायाचित्रकार प्रकाश सकपाळ, पराग गुप्तन, फोटोग्राफी प्रशिक्षक पराग शिंदे, महेश तावरे यांचा असोसिएशन च्या वतीने सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर असोसिएशन च्या वतीने घेण्यात आलेल्या ‘रंगोत्सव 2025’ या फोटोग्राफी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
पेण, अलिबाग, पोयनाड, मुरूड ,रोहा, पाली, नागोठणे, खोपोली, कर्जत, नेरळ, माणगाव, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, उरण , रसायनी फोटोग्राफर्स असोसिएशन मधून 465 फोटोग्राफर्स नी या एक्स्पो ला भेट दिली.
हा एक्स्पो यशस्वी करण्यासाठी पेण फोटोग्राफर्स असोसिएशन ने मेहनत घेतली.