नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

7

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो. 7498051230

चंद्रपूर, दि. 29 :- भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. सदर पुनरिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

1) मतदार नोंदणी अधिनियम, 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सुचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 30 सप्टेंबर 2025, 2) कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी 15 ऑक्टोबर 2025 रोजी, 3) वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी 25 ऑक्टोबर 2025 रोजी, 4) प्रकरणपरत्वे नमुना 18 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा दिनांक 6 नोव्हेंबर 2025, 5) हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई 20 नोव्हेंबर, 6) प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी 25 नोव्हेंबर रोजी, 7) दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी (मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 12 अंतर्गत) 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 पर्यंत, 8) दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे 25 डिसेंबर रोजी आणि 9) मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी 30 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येईल.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासंबंधी नमुना – 18 मधील अर्ज स्वीकरण्याकरीता जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार, मुख्याधिकारी (बल्लारपूर, घुग्घुस, वरोरा), अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त (चंद्रपूर महानगर पालिका), सहायक संवर्ग विकास अधिकारी पं.स. चंद्रपूर, सहायक निबंधक चंद्रपूर, तालुका कृषी अधिकारी चंद्रपूर यांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

तरी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत दावे व हरकती 30 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबर 2025 या कालावधीत स्वीकरण्यात येणार आहे. आपले नाव पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत समाविष्ट करण्याकरीता पात्र असलेल्या पदवीधर मतदारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.