Home latest News यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थे’चा सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही : अशोक सराफ
‘यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थे’चा सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही : अशोक सराफ
चाहत्यांच्या तुफान गर्दीत अशोक सराफ यांचा उलव्यात भव्य नागरी सत्कार!
‘बहुरूपी अशोक’च्या मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध!
कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747
पनवेल/उलवे, ता. २९ : “आज जी काही माझी अभिनय क्षेत्रात वाटचाल सुरू आहे ती केवळ रसिकांमुळेच! रसिक प्रेक्षक माझे मायबाप आहेत. माझ्या आयुष्यात निवेदिता आली आणि आयुष्यच उजळून गेले. सर्वांनाच अशा बायका मिळतात असे नाही. मी रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम प्रामाणिकपणे केले, मला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून प्रेम दिले. या पूर्वी माझे अनेक सत्कार झालेत, पण उलव्यातील यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थे’मार्फत झालेला नागरी सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यामुळे महेंद्रशेठ घरत यांच्याही प्रेमात मी पडलोय,” असे ‘पद्मश्री’ आणि ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारप्राप्त अशोक सराफ नागरी सत्काराला उत्तर देताना म्हणाले.
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, अभिनयाचे बादशहा अशोक सराफ यांचा चाहत्यांच्या तुफान गर्दीत उलव्यातील ‘भूमिपुत्र भवन’ येथे रविवारी सपत्निक भव्य नागरी सत्कार सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नरेंद्र बेडेकर निर्मित ‘बहुरूपी अशोक’च्या मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध झाले होते. हा नागरी सत्कार समारंभ यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेने आयोजित केला होता.
या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल सुशीलकुमार शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, रायगडचे खासदार सुनील तटकरे, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल सुशीलकुमार शिंदे, माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते.
अशोक सराफ यांच्यावर प्रेम करणारे चाहत्यांनी तुफान गर्दी केल्याने ‘भूमिपुत्र भवन’ खचाखच भरले होते. यावेळी अशोक मामांना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात सलामी दिली.
रायगडचे खासदार सुनील तटकरे म्हणाले, “अशोक सराफ यांच्यासारखा कलाकार पुन्हा होणे नाही. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळायला हवा. आम्हालाही राजकारणात रोज नवनवीन भूमिका कराव्या लागतात. अशा सर्व कलाकार मंडळींना एकत्र आणण्याचे काम महेंद्रशेठ घरत यांनी केले. ही किमया केवळ महेंद्र शेठ हेच करू शकतात.”