आ. समीर कुणावार यांचे हस्ते पुरपीडित कॉलनीतील रहिवाश्याना पट्टे व आखीव पत्रिकेचे वाटप.
आमदार समीर कुणावार यांच्या अथक परिश्रमाचे फलित. पुरपीडित कॉलनीतील रहवाश्याना तब्बल ४० वर्षानंतर मिळाला न्याय.
मुकेश चौधरी प्रतिनीधी
हिंगणघाट:- आमदार समीर कुणावार याचे अथक परिश्रमाचे फलित म्हणून हिंगणघाट येथील पुरपीडित कॉलनीतिल रहवाश्याना तब्बल ४० वर्षानंतर न्याय मिळाला. आज दुसऱ्या टप्यातील आ समीर कुणावार यांचे हस्ते पिंपळगाव रोड व तुकडोजी वार्डतील ४८४ रहिवाश्याना आखीव पत्रिका व पट्याचे वाटप करण्यात आले. तर उद्या तिसऱ्या टप्प्यात २०० रहवाश्याना पटयाचे वाटप होणार आहे.
आज स्थानिक तहसील कार्यालयाचे सभागृहात वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजपा महामंत्री किशोर दिघे, तहसीलदार श्रीराम मूंधड़ा, भूमि अभिलेख संजय मड़के, नायब तहसीलदार पवार यांची उपस्थिति होती. याप्रसंगी बोलताना आमदार कुणावार म्हणाले की माझ्या मनातील ड्रीम प्रोजेक्ट ची पूर्तता झाल्याचे आज समाधान होत आहे. कारण गत ४० वर्षापासून प्रलबित असणाऱ्या येथील रहिवाश्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
याबाबत माहिती देताना आ कुणावार पुढे म्हणाले हिंगणघाट ला १९७९ मध्ये महापुर आला होता. त्यात नादिकाठावरिल वस्तीत मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी घुसुन प्रचंड नुकसान झाले होते. तेव्हा तत्कालीन शासनाने त्यांना शहराबाहेर विविध ठिकाणी पुरपीडित वसाहत तयार करुन सुमारे १३०० पुरग्रस्त कुटुंबियांना घरे दिली. परंतु त्यांना कायमस्वरूपी पट्टे व आखीव पत्रिका न दिल्याने विविध अडचनीचा सामना करावा लागत होता. घराचे दुरुस्ती किंवा नुतनीकरिता कर्ज, वारशाची नावे चढ़वीने, फेरफार करने शक्य होत नव्हते. या करिता अनेक आंदोलने पण झाली पन प्रश्न मार्गी लागला नाही. मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर याकरिता शासन दरबारी वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवल व महसूल विभागासोबत ५० ते ६० बैठकी पार पडल्या. विद्यमान जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाइत व तहसीलदार श्रीराम मूंधड़ा यांनी याकरिता सकारात्मक दृष्टिने काम करून अथक परिश्रम घेतले.अनेकांचे दस्ता ऐवज मिळत नव्हते, तर काहीची कागदपत्रे मिळत नव्हती ते शोथुन काढण्याकरिता महसूल विभागाने कठोर परिश्रम घेतले व काम पूर्ण केले. पहिल्या टप्प्यात तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते ९ आगस्ट २०१९ ला पहिल्या टप्प्यात सुमारे २०० पेक्षा अधिक रहिवाश्याना पटयाचे वितरण करण्यात आले होते. आज दुसऱ्या टप्प्यात ४८४ लोकांना वितरण करण्यात येत आहे. उद्या तिसऱ्या टप्प्यात नांदगांव पुरपीडित वसाहतीतिल सुमारे २०० पेक्ष्या अधिक रहिवाश्याना आखिव पत्रिका व पटयाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार समीरभाऊ कुणावार यांनी सरतेशेवटी दिली.
संचालनासह उपस्थीतांचे आभार तहसीलदार पवार यांनी मानले. कार्यक्रमाला किशोर दिघे बिस्मिलाखांन, नागरसेवक अंकुश ठाकुर, छाया सातपुते, रविला अखाड़े, आशीष पर्वत, नरेश युवनाथे, शीतल खंदार, राकेश शर्मा, चंदू माळवे, शिवाजी अखाड़े, अनिल गहेरवार, संदीप सुरकार, आशिष वरखडे, निलेश पोगळे, बंटी वाघमारे, तुषार हवाईकर आदिची उपस्थिती होती.