हिंगणघाट माजी नगरसेवक प्रलय तेलंगला अटक.

49

हिंगणघाट माजी नगरसेवक प्रलय तेलंगला अटक.

घटना ही 24 ऑक्टोबर ला घडली, आणी फिर्यादीने ती 4 दिवसा नंतर 28 ऑक्टोबर हिंगणघाट पोलिस स्टेशनला नोंदवली

 

मुकेश चौधरी 

वर्धा:-  जिल्हातील हिंगणघाट मध्ये पैशांच्या आर्थिक व्यवहारामध्ये एअरगनने अजय करवाला जिवे मारण्याची धमकी देणाया माजी नगरसेवक प्रलय तेलंग आणी त्यांचे मित्र नितीन साखरकर याला हिंगणघाट पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी हवाई बंदूक आणि चाकू जप्त केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगणघाट नगर पालिकेचे माजी नगरसेवक प्रलय तेलंग हे राम मंदिर वार्डतील अजय करवा यांच्या निवासस्थानी गेले होते. तेथे पैशांच्या आर्थिक व्यवहाराबाबत दोघांमध्ये भांडण होते.

रात्री 10 च्या सुमारास अजय करवा आपल्या वाहनातून हिंगणघाट येथील संविधान चौकातुन जात होते. त्यावेळी प्रलय तेलंगने त्यांचे वाहन थांबवून अजय कारवा यांच्यावर हवाई बंदूक तानली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात अजय करवा यांच्या फिर्यादीवरून हिंगणघाट पोलिसांनी प्रलय तेलंग आणी नितीन साखरकर विरोधात भादवी कलम 452, 504, 506, 507 तसेच 4/25 आर्म अक्ट नुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आणी पोलिसांनी एअर गन आणि चाकू जप्त केले. आज न्यायालयात हजर केले असता त्यांना जमानतीवर सोडुन देण्यात आले.

अजय करवा विरोधात पण तक्रार दाखल
या प्रकरणात, अजय कारवाविरोधात प्रलय तेलंगच्या तक्रारीवरून 294 506 कलमा खाली गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास, पोलिस निरिक्षक सत्यवीर बांदीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.