हिंगणघाट महिलेच्या पोटावर पोलीस कर्मचारी ने कटर मारून केले जखमी.
आरोपींमध्ये अन्य दोघांचाही समावेश.
मुकेश चौधरी प्रतिनिधी
हिंगणघाट:- येथील डांगरी वार्डात राहणारी महिला मालिनी मुरलीधर भांगे वय 36 तिच्यासोबत बुधवारी रात्री वार्डातील देवेंद्र हुरले कृष्णा हुरले वसंत हुरले यांचा रस्त्यावर बांधकामाचे साहित्य पडल्याच्या कारनावरून वाद झाला यात मुरलीधर भांगे यांनी तिघांना समजण्याचा प्रयत्न केला परंतु वाद विकोपाला गेल्याने तिघा आरोपींनी मुरलीधर ला मारहाण केली तेव्हा त्याची पत्नी मालिनी मुरलीधर भांगे वय 36 वर्ष ही मध्यस्थी करण्यासाठी गेली असता आरोपी कृष्णा हुरले वय 28 वर्ष याने कटर सारख्या धारदार शास्त्राने मालिनी च्या पोटावर मारून तिला रक्तबंबाळ केले तर देवेंद्र हुरले व वसंत हुरले यांनी महिलांचे केस पकडून तिला खाली पाडले आरोपी कृष्णा हुरले हा पोलीस प्रशासनात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे तो सध्या सावंगी येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असल्याचे माहिती पोलीस सूत्रांनी दिली ही घटना घडल्यावर जखमी महिला मालिनी भांगे ही उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारार्थ भरती झाली तेथून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली पोलिसांनी रुग्णालयांमध्ये जाऊन महिलेचे बयान नोंदविले वैद्यकीय अहवाल व महिलेच्या बयाना वरून पोलिसांनी आरोपी देवेंद्र ,,कृष्णा; वसंतराव हुरले विरुद्ध भा द वि 324, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे यात आरोपी वसंत हुरले यास अटक झाली असून अन्य दोन आरोपी त्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत कृष्णा हुरले हा फरार असल्याची ची माहिती अमलदार यांनी दिली फरार आरोपींचा व घटनेचे तपास पोलिस करीत आहे