सिंधुदुर्ग कामगार विरोधी बिल तात्काळ मागे घ्या, भारतीय मजदूर संघाची मागणी.

49

सिंधुदुर्ग कामगार विरोधी बिल तात्काळ मागे घ्या, भारतीय मजदूर संघाची मागणी

केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कामगार कायद्यामधील तरतुदीच्या विरोधात भारतीय मजदूर संघाच्यावतीने येथील तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कायद्यामधील कामगार विरोधी तरतुदी तत्काळ मागे घ्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करून सरकारला जागे करावे लागेल , असा इशारा यावेळी देण्यात आला.

प्रतिनिधी
सिंधूदुर्ग:-  जिल्हातील कणकवली मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कामगार कायद्यामधील तरतुदीच्या विरोधात भारतीय मजदूर संघाच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कामगार कायद्यामधील कामगार विरोधी तरतुदी तत्काळ मागे घ्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करून सरकारला जागे करावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच तहसीलदार आर . जे . पवार यांना निवेदन देण्यात आले.

भारतीय मजदूर संघाने केंद्र शासनाने आणलेल्या नविन कामगार कायद्यातील तरतुदीना विरोध दर्शविला आहे . कायद्यातील औद्योगीक संबंधसंहिता 2020, औद्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि सेवाशर्ती संहिता 2020 यातील काही तरतुदीमुळे कामगारांचे अधिकार धोक्यात येणार असल्याचे मजदूर संघाचे म्हणणे आहे. त्यामुळे याविरोधात मजदूर संघाने देशभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गतच येथील तहसीलदार कार्यालयासमोर हि निदर्शने करण्यात आली. तसेच उपस्थित कामगारांनी केंद्र शासनाविरुध्य जोरदार घोषणाबाजीही केली.

भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष भगवान साटम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या निदर्शनाच्यावेळी उपाध्यक्ष अशोक घाडी, कोषाध्यक्ष सुधीर ठाकूर, सचिव हरी चव्हाण, कणकवली तालुका प्रमुख राजेंद्र आरेकर, वैभववाडीचे दिपक गुरव, कुडाळच्या जयश्री मडवळ, हेमंतकुमार परब, देवगडचे सत्यवान कदम, प्रकाश वाडेकर, विकास गुरव, विकास चाळके, अजित सावंत, महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सल्लागार समिती सदस्य अँड. विशाल मोहिते, भारतीय मजदूर संघ प्रदेश संघटनमंत्री रवींद्र पुरोहित, सुनीता ताटे, शुभांगी सावंत आदी उपस्थित होते.