खळबळजनक* *माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सर्वानंद वाघमारे यांनी केला बामनवाड्याच्या नागरिकांचा विश्वास घात* *गावातील नागरिकांचा पारा भडकला* *गावकऱ्यांचा देशी दारू भट्टी ला तीव्र विरोध*

15

*खळबळजनक*

*माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सर्वानंद वाघमारे यांनी केला बामनवाड्याच्या नागरिकांचा विश्वास घात*

*गावातील नागरिकांचा पारा भडकला*

*गावकऱ्यांचा देशी दारू भट्टी ला तीव्र विरोध*

खळबळजनक* *माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सर्वानंद वाघमारे यांनी केला बामनवाड्याच्या नागरिकांचा विश्वास घात* *गावातील नागरिकांचा पारा भडकला* *गावकऱ्यांचा देशी दारू भट्टी ला तीव्र विरोध*
खळबळजनक*
*माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सर्वानंद वाघमारे यांनी केला बामनवाड्याच्या नागरिकांचा विश्वास घात*
*गावातील नागरिकांचा पारा भडकला*
*गावकऱ्यांचा देशी दारू भट्टी ला तीव्र विरोध*

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

राजुरा तालुक्यातील बामणवाडा येथे देशी दारूचा चांगलाच वादंग निर्माण झाला असून दिनांक २८/१०/२०२१ च्या ग्रामसभेत सरकार मान्य देशी दारू सुरू करण्याचा विषय ठेवण्यात आला होता. मात्र सदर विषयाला वॉर्ड नं. एक च्या सदस्या सुजाता मेश्राम यांनी तीव्र विरोध करून सदर विषय ग्रामसभेच्या विषय सुचीतून वगळण्यात यावा अशी मागणी निवेदनातून केल्याने गावातील जनाधार सुजाता मेश्राम यांच्या बाजूने जाताना दिसताच ग्राम पंचायत चे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सर्वांनद वाघमारे यांनी यु टर्न घेत दारू भट्टी सुरू करण्या बाबत च्या विषयाला विरोध केला मात्र या महाभागांनी मासिक बैठकीतच आर्थिक स्वार्थापोटी देशी दारूच्या भट्टी ला समर्थन दिले असल्याची माहिती ग्रामपंचायत चे वॉर्ड क्र. दोन चे सदस्य प्रफुल चौधरी यांनी उघड केली. तसेच सदस्य प्रफुल चौधरी यांनी सर्वानंद वाघमारे हे पन्नास हजार घेऊन मासिक सभेत देशी दारू भट्टी ला सम्मती दिली आहे असा आरोपही त्यांनी केला.

मात्र गावकऱ्यांना असे कृत्य वाघमारे यांचे माहीत नसल्याने निवेदनातून दारू भट्टी सुरू करण्याच्या विषयाला विरोध केला असल्याने नागरिक वाघमारे जाहीर सत्कार करण्याचे ठरविले होते.
मात्र गावकऱ्यांची भ्रम निराशा केली असल्याने नागरिक नाराज झाले.
गावकऱ्यांच्या या महाभागा प्रती तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेकांनी वाघमारे यांचा जाहीर निषेध केला आहे. तसेच वाघमारे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानतात मग असे निंदनीय कृत्य कशासाठी? अशी खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.

वाघमारे यांनी यु टर्न मारल्याने सर्व नागरिक बुचकळ्यात पडले आहेत.
पण तोंड घशी पडलेले विद्यमान सदस्य वाघमारे आता दारू बंदी च्या बाजूने शेवट पर्यंत राहणार असे कोरडे वादे गावकऱ्यांना देत असून खरच अश्या सदस्यांकडून विश्वासाची अपेक्षा करायची काय? असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.