बल्लारपूरमध्ये महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी पळविली

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो:8830857351

चंद्रपूर, 27 ऑक्टोबर: बल्लारपूर शहरात दिवाळीचा उत्साह सगळीकडे साजरा होत असताना बुधवारी सकाळी भरवस्तीच्या व गजबजलेल्या वर्दळीच्या ठिकाणी फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातून सोन्याची चेन खेचून चोरटे पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

ल्लारपूर येथील सिध्दार्थ वॉर्डात राहणारी एक महिला ही नित्यनेमाने रोज सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जाते. सकाळी फिरायला गेली असता वस्ती विभागातील गोल पूल ते अग्निशमन विभागाच्या कार्यालयाच्या दरम्यान रेल्वे क्वॉर्टरकडून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन व त्यात असलेले भगवान बुध्दाचे लॉकेट अंदाजे 30 हजार रुपये किंमतीचे दागिने ओढून पसार झाले.

 

विशेष बाब म्हणजे, नगर परिषदेकडून वस्ती विभागाकडे जाणार्‍या मार्गावर सतत वर्दळ असते. शिवाय याच परिसरात ठोक भाजी खरेदी-विक्री होते तसेच 24 तास सक्रीय असणारे अग्निशमन विभागाचे कार्यालय असताना चोरटयांनी महिलेच्या गळ्यातून दागिने चोरण्याचे धाडस दाखवून पोलिस विभागासमोर आव्हान निर्माण केले आहे. यापूर्वी ओसाड असलेल्या परिसरात अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.

मात्र ऐन वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी वनविभागाच्या कार्यालयाकडे फिरायला गेलेल्या इसमाची दीड तोळयाची चेन आणि व्यापारी हरेश ठक्कर यांना बंदूक दाखवून चेन चोरून नेली होती. शहरातील अनेक वॉर्डातही घरफोड्या झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here