अवैध व्यवसाय प्रतिबंधित करा, आ. किशोर जोरगेवार यांच्या चंद्रपूर पोलिस प्रशासनाला सूचना

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो:8830857351

जिल्ह्यातील दारुबंदी उठल्या नंतर दारुबंदी व्यवसायात गुंतलेले गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडांनी इतर अवैध व्यवसाय सुरु केले आहे. यात ऑनलाईन क्रिकेट जुगार चालविनाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे युवावर्ग या कामात गुंतत असुन अनेकांनी आर्थिक नुकसाणीमुळे आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आले आहे. याकडे गांभिर्याने लक्ष देत जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसायांवर प्रतिबंध घाला अशा सुचना आ. जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांना केल्या.

रविंद्रसिंग परदेशी हे चंद्रपूर जिल्ह्याचे नवे पोलिस अधिक्षक म्हणून रुजु झाले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांची भेट घेत या सुचना केल्या. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर युथ अध्यक्ष कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, घूग्घुस शहर संघटक विलास वनकर, अल्पसंख्याक विभागाचे शहर युथ अध्यक्ष राशेद हुसेन, शहर संघटक विश्वजीत शाहा आदींची उपस्थिती होते. चंद्रपूरात अवैध व्यवसायाने पून्हा डोके वर काढले आहे. जिल्ह्यात ऑनलाईन सट्टा, सट्टापट्टी, जुगार, क्रिकेट जुगार, अवैध वाहतुक, सुगंधीत तंबाखु या सारखे अनेक अवैध व्यवसाय वाढू लागले आहे. याचा मोठा परिणाम कायदा सुव्यवस्थेवर निर्माण झाला आहे. चंद्रपूरातील दारु बंदी उठल्या नंतर अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अशा व्यवसायात गुंतल्या गेले आहे.

जिल्हात मादक पदार्थ , गांजा विक्रीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा व्यवसायांवर अपेक्षीत अशी कार्यवाही होतांना दिसत नाही. राज्यात निर्बंध असलेल्या सुगंधीत तंबाखूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याच्या सुचना यावेळी आ. किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. क्रिकेटवर ऑनलाइन जुगार खेळणाऱ्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. सहज रित्या त्यांना जुगार लावण्यासाठी मोबाईल ॲपलिकेशन उपलब्ध होत आहे. सदर ॲपस् उपलब्ध करुन देणाऱ्या बुकींवर पोलिस प्रशासनाने लक्ष ठेवत कार्यवाही करण्याच्या सुचनाही यावेळी आ. जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांना केल्या. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पुष्पगुच्छ देत पोलिस अधिक्षकांचे स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here