सामाजिक कार्यकर्त्या मा.दिपीका आग्रे यांना “युवा प्रेरणा पुरस्काराने” सन्मानित

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी

मो. नं.९८६९८६०५३

विलेपार्ले- कुणबी समाजोन्नती संघ मुंबई व कुणबी युवा मुंबई आयोजित “बळी पहाट” शोध इतिहासाचा,सत्य सांस्कृतिचा या कार्यक्रमानिमित्त युवा प्रेरणा पुरस्कार सन्मानित मा.दिपीका संदीप आग्रे (कुणबी महिला मंडळ-सचिव आणि भारतीय लोकसत्ताक संघटना-उपाध्यक्ष महाराष्ट्र ) यांना दिनांक २६/१०/२०२२रोजी मा.दिनानाथ नाट्येगृह विलेपार्ले पूर्व मुंबई येथे ‘युवा प्रेरणा’ पुरस्काराने गौरवण्यात आला.यावेळी पुरस्कार प्रदान करण्याकरिता मुख्य उपस्थित ओ बी सी जनमोर्चाचे अध्यक्ष अण्णाभाऊ शेंडगे व कुणबी समाजोन्नती संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बावकर ,कुणबी महिला मंडळाच्या माजी सचिव रुचिता बोलाडे, कुणबी समाजोन्नती संघाचे सचिव अरविंद डाफळे,कुणबी राजकीय संघटन समिती सचिव नंदकुमार मोहिते,कोकणचे गाडगेबाबा जोशी काका,इत्यादीमान्यवर उपस्थित होते आणि कुणबी युवा अध्यक्ष माधव कांबळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

 तसेच दिपीका आग्रे मॅडम आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाल्या की कुणबी युवा ची खूप खूप आभारी आहे. हा सन्मान मला जरी मिळाला असला तरी त्याचे वाटेकरी कुणबी महिला मंडळ व भारतीय लोकसत्ताक संघटना आहे. कारण यांच्याकडूनच मला चळवळीत काम करण्याची व परिवर्तन करण्याची प्रेरणा मिळते. भारतीय लोकसत्ताक संघटनेने 24 सप्टेंबर 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्याची जी संधी दिली आणि कुणबी युवाने त्यासाठी मला युवा प्रेरणा पुरस्कार देऊन चळवळीत प्रबोधनकारी विचार मांडण्याची जी ताकद दिली त्याबद्दल मी या दोन्ही संघटनेची आभारी आहे.

विद्यार्थीदशे पासूनच मी या चळवळीत आहे आणि यापुढेही राहीन. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुजन समाजाचे आयडॉल आहेत. छत्रपती शिवरायांचे स्वराज्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या सभेत चिपळूणला हत्तीच्या माळावर जो संदेश दिला की, मला तुमच्यातील पंतप्रधान झालेला पाहायचा आहे. या दोन्ही महापुरुषांच्या या संकल्पना पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन.मेरे सपनो का भारत ,सम्राट अशोक का भारत व इडा पिडा टळून बळीचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करीन.

मला मिळालेला हा पुरस्कार मी बहुजन समाजातील जन्मलेल्या सर्व महापुरुषांना अर्पण करीत आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.सदर युवा प्रेरणा पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल मा.दिपीका आग्रे मॅडमचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here