कोणतेही पद नसतानाही मतदारसंघातील अनेकांचे प्रश्न मार्गी लावल्याने माझा विजय निश्चित भाजपा नेते दिलीप (छोटमशेट) भोईर यांना विश्वास

52

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: कोणतेही पद माझ्याकडे नसतानाही अलिबाग विधानसभा मतदारसंघातील अनेकांचे प्रश्न मार्गी लावल्यानेच त्यांची मते माझ्या पारड्यात पडून माझा विजय निश्चित असल्याचे भाजपा नेते दिलीप भोईर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला शिंदेगटाचे शिवसेना उमेदवार महेंद्रशेट दळवी यांना महायुतीकडून या मतदारसंघातील उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उत्सुक असलेले भाजपा नेते दिलीप (छोटमशेट) भोईर यांनी ठरविल्याप्रमाणे अपक्ष उमेदवार म्हणून मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्याकड़े भरला. त्यानंतर जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूलसमोरील भव्य जाहीर सभेत ते बोलत होते.

२३ महिन्यांपूर्वी मी भाजपात प्रवेश केल्यानंतर मला आशा होती की, या मतदारसंघाचे मला नेतृत्व करायला मिळेल; परंतू महायुतीने शिवसेना उमेदवाराला उमेदवारी दिल्याने मी भाजपात असतानाही मला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरावा लागला. गेल्या सहा महिन्यांपासून या मतदारसंघातील विविध भागांत फिरून मतदारसंघात नेमके काय प्रश्न आहेत यांचा नीटपणे अभ्यास केला. त्यानंतरच हे प्रश्न सोडविण्याचे मनाशी खुणगाठ बांधूनच विधान सभेवर जाण्यासाठी आज अपक्ष उमेदवार म्हणून मी उमेदवारी अर्ज भरला आहे. वेळप्रसंगी अनेकांच्या अडिअडचणीला धाऊन गेल्याने या मतदारसंघातील मोठ्यासंख्येने कार्यकर्त्यांसह मतदारांनी केलेली मोठी गर्दी पहाता, माझा विजय निश्चित असल्याचेही श्री. भोईर यावेळी म्हणाले. या मतदारसंघातील माझे कार्यकर्ते आणि मतदार माझी एनर्जी असून, माझ्या दरवाजावर आलेला कोणीही रिकाम्या हातांनी परत गेला नाही असेही श्री. भोईर म्हणाले. श्री. भोईर यांचे समर्थकांनीही यावेळी आपल्या भाषणात भोईर यांना प्रचंड मतांनी विधानसभेवर पाठवा असे आवाहन केले. कोठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अलिबाग शहर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.