चंद्रपूर पोलीसांची दमदार कामगिरी : वरोऱ्यात 75 लक्ष रु ची रोकड जप्त 💰

💥बिग ब्रेकींग 💥@💥वरोरा

चंद्रपूर पोलीसांची दमदार कामगिरी :
वरोऱ्यात 75 लक्ष रु ची रोकड जप्त 💰

चंद्रपूर पोलीसांची दमदार कामगिरी : वरोऱ्यात 75 लक्ष रु ची रोकड जप्त 💰

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 29 ऑक्टोंबर
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 च्या अनुषंगाने संशयीतरित्या रोख रक्कमेची वाहतुक करणाऱ्यांना पकडुन कार्यवाही करण्यासाठी जिल्हयात ठिकठिकाणी एस.एस.टी. पॉईन्ट नाकाबंदी तसेच एफ.एस.टी. पेट्रोलींग साठी वेगवेगळे पथक नेमण्यात आले असुन त्यामार्फतीने अवैध रोख रक्कम वाहतुकीवर लक्ष ठेवुन असतांना आज 29 ऑक्टोंबर रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरुन वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत एका संशयीत चारचाकी वाहनांची पोलीस पथक आणि एफ.एस.टी.पथकाने संयुक्तरित्या तपासणी केली असता त्या वाहनात मोठया प्रमाणात रोख रक्कम असल्याचे दिसुन आल्याने त्या वाहनास पोलीस स्टेशन वरोरा येथे आणुन वाहनातील रोख रक्कमेबाबत एफ.एस.टी. पथक व वरोरा पोलीसांनी वाहन धारकाकडे विचारपुस केली असता, वाहन धारकाने रोख रक्कम एकुण 75,00,000/- रु. (अक्षरी रु.पंचहत्यात्तर लक्ष) वाहतुकी बाबतचे समाधानकारक उत्तर न दिल्याने त्या वाहनातील रोख रक्कमेचा पंचनामा करुन ती रोख रक्कम जप्त करुन पुढील चौकशी करीता आयकर विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनात सहा.पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा नयोमी साटम यांच्या नेतृत्वात वरोरा पोलीस आणि एफ.एस.टी.पथक वरोरा यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here