आरोग्यम् धनसंपदा – पूनम मस्की
– राजुरा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

– राजुरा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण
मो 9923497800
राजुरा : -नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था व ॲड. यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय राजुरा यांच्या संयुक्त विद्यमानाने ऍड. यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय राजुरा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी चे कोषाध्यक्ष सतीश धोटे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून पूनम मस्की उपशिक्षणाधिकारी,जी. प.चंद्रपुर, विजय ढोले, तांत्रिक विभाग जी. प. चंद्रपूर, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महिला तालुका अध्यक्षा अल्का दिलीप सदावर्ते, यादवराव धोटे मेमोरियल संस्थेचे सचिव डॉ. अर्पित धोटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य इर्शाद शेख, मीनाक्षी कालेश्वर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती . कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अल्का सदावर्ते यांनी ईश्वरस्तवन व आरोग्यम् धनसंपदा हे स्तवन गायिले. मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये नव्वद लोकांनी तपासणी करून घेतली. उपशिक्षणाधिकारी पूनम मस्के यांनी आरोग्याची काळजी कशा प्रकारे घ्यावी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विजय ढोले यांनी प्रेक्षकांशी संवाद साधून व्यायामाचे व सुदृढ आहार याचे महत्व विषद केले. अध्यक्षीय मनोगतातून सतीश धोटे यांनी चांगल्या समाजपयोगी कार्यक्रमासाठी सदैव सहकार्य करणार असल्याचे मत व्यक्त करीत प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. नेफडो चे तालुका उपाध्यक्ष दिलीप सदावर्ते यांच्या मार्गदर्शनखाली सदर मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.यावेळी स्वाती देशपांडे, विलास कुंदोजवार, सर्वानंद वाघमारे, स्वतंत्रकुमार शुक्ला यांना नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे ओळखपत्र व नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तसेच कनिष्ठ महाविद्यालयात 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी आयोजकांच्या वतीने मान्यवरांना शाल, श्रीफळ व वृक्ष भेट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद झाडे यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य इर्शाद शेख यांनी व आभार अल्पणा दुधे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नेफडो चे नागपूर विभाग अध्यक्ष बादल बेले, उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे, चंद्रपूर जिल्हा संघटक श्रीरंग नागोसे, राजुरा तालुका अध्यक्ष संतोष देरकर, श्री शिवाजी हायस्कूल चे मुख्याध्यापक केवाराम डांगे, आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर व त्यांचे शिक्षकवर्ग यांनी भेट देऊन आपले आरोग्य तपासणी करून घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विना देशकर, संगीता पाचघरे, राजश्री उपगन्लावार, माणिक उपलंचीवार, नरेंद्र देशकर, विलास कुंदोजवार, सुनिता उगदे, नजीर सय्यद, रेणुका देशकर, मनीषा राखुंडे, वर्षा पोडे, सुप्रिया गोडे, मंगेश कुळमेथे, धनंजय ढवरे, आसावरी धोटे, किरण हेडाऊ, अल्का गंगशेट्टीवार, आशिष करमरकर, अभिषेक बाजूजवार आदिसह नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा तसेच एड यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.