डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कारंजा घाडगे येथे संविधान दिवस समारोह संपन्न.

61

✒कारंजा घाडगे प्रतिनिधी✒

कारंजा घाडगे:- त्रिरत्न बौद्ध महासंघ व संभाजी ब्रिगेड शाखा कारंजा घाडगे यांच्या वतीने संविधान दिवस मोठ्या उत्साहवर्धक वातावरण साजरा करून संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणराव वाळके बामसेफ वर्कर तसेच प्रमुख पाहुणे संगीता कामडी महिला अध्यक्ष कारंजा नागरी समस्या संघर्ष समिती, राजेश दहिवडे, ज्योती यावले कारंजा, सदाशिव मनोहरे, नागरी समस्या संघरसग समितीचे विनोद चापले, विचार मंचावर उपस्थित होते. या सर्वांनी संविधाना बद्दल माहिती दिली तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक नागले कार्यवाह बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कारंजा तसेच सूत्रसंचालन धम्ममित्र मंदा नागले यांनी केले व आभार प्रदर्शन गजानन बोरकर यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता धम्ममित्र जी .आर .गवई, उमेश पाचपोहर, पियुष रेवतकर, राजेंद्र इंगळे, मनोज वानखेडे, संगीता पाटील, बबिता शेंडे, शीला विगने, रेखा गवई, कांचन गजभिये, झाडेताई, प्रेरणा गजभिये, सुलोचना इंगळे, पाचपोहरताई, इंगळेताई यांनी सहकार्य केले.