वनहक्क ग्रामसभा प्रतिनिधीची निसर्ग संसाधने व्यवस्थापन उपजीविका विकास कार्यशाळा संपन्न

52

✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीड:- विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था नागपूर व रीवार्डस मल्टीपर्पज सोसायटी, नागभिड च्या विद्यमाने अवार्ड कॉन्फरन्स हॉल नागभीड येथे वनहक्क प्राप्त ग्रामसभा प्रतिनिधीची निसर्ग संसाधने व्यवस्थापन व उपजीविका विकास कार्यशाळा संपन्न झाली. या दोन दिवसीय कार्यशाळेत नागभीड तालुक्यातील कोरंबी, कसरला, रेंगातुर, तिवरला, कोदेपार, वासाळा मुक्ता व लखमापूर सावरला या ग्रामसभा चे 42 प्रतिनिधी उपस्थित होते.
या कार्यशाळेत सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक अमित कळस्कर विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था नागपूर चे कार्यकारी संचालक लीप गोडे, प्रकल्प समन्वयक दिलीप नवघरे, ग्राम आरोग्‍य संस्‍था घाटी – कुरखेडाचे रूपचंद दखणे यांनी उपस्थितांना अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी कायदा 2006 नियम 2008 व सुधारित नियम 2012 ची माहिती देण्यात आली तसेच सामुहीक वनहक्काची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, ग्रामसभा अंतर्गत सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीची कर्तव्य भूमिका व जबाबदारी ग्रामसभा क्षेत्रातील निसर्ग संशोधनाचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सदर प्रकल्पाची कार्यवाही ग्रामसभेचे प्रतिनिधी ग्रामस्तरावर करणार आहेत असे अभिमत ग्रामसभेच्या प्रतिनिधींनी कार्यशाळेच्या समार्पण प्रसंगी करण्यात आले. या कार्यशाळेचे संचालन गुणवंत वैद्य यांनी केले कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी युवराज रामटेके, अभिनव कुमार, कैलास नन्नावरे, सुनिता घाटे यांनी अथक परिश्रम घेतले.