मॉडेल स्कूल’ पारडी (ठवरे) येथे नियोजन व सहविचार सभा संपन्न

48

मॉडेल स्कूल’ पारडी (ठवरे) येथे नियोजन व सहविचार सभा संपन्न

मॉडेल स्कूल' पारडी (ठवरे) येथे नियोजन व सहविचार सभा संपन्न
मॉडेल स्कूल’ पारडी (ठवरे) येथे नियोजन व सहविचार सभा संपन्न

✒अरुण भोले ✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीड : -चालू शैक्षणिक सत्रात जि.प चंद्रपूर अंतर्गत पंचायत समिती नागभीड मधुन जि. प. उच्च प्राथ. शाळा पारडी (ठवरे) ची मॉडेल स्कूल म्हणून निवड करण्यात आलेली आहे. मॉडेल स्कूल साठी आवश्यक निधी जिल्हा स्तरावरुन शाळेला प्राप्त झाला असून खर्चाचे अनुषंगाने दिनांक 25 नोव्हेंबर 2021 ला जि. प. उच्च प्राथ. शाळा पारडी (ठवरे) येथे शाळा व्यवस्थापन समितीची नियोजन व सहविचार सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने नियोजन व सहविचार सभेला मार्गदर्शन कर्रण्याकरीता मान. संजयभाऊ गजपुरे सदस्य, जि. प. चंद्रपूर व स्थायी समिती सदस्य व मान. दिलीपजी दोनोडे सरपंच, ग्रामपंचायत पारडी (ठवरे) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्या सभेत सर्व शिक्षकानी आपापल्या संकल्पना मांडल्या व शासन निर्देशानुसार आवश्यक साहित्याची निवड करुनखरेदी करण्याचा ठरावा सर्वानुमते संमत करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री. मालचंदजी खडाळे यांनी आपल्या प्रस्तावनेत ‘मॉडेल स्कूल’ बाबत सविस्तर माहिती सांगितली. त‍सेच मान. संजयभाऊ गजपुरे यांनी शाळेला गावक-यांच्‍या सहकार्याने भौतिक सुविधा कशा मिळविता येतील याबाबत चर्चा करुन मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मान. संजयभाऊ गजपुरे व मान. दिलीपजी दोनोडे यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सभेला मान. गोपालजी मस्के, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, मान. गुरुदेवजी सारये, मान. नितीनजी शेंडे ग्रा. पं. सदस्य आणि श्री. अशोक शेंडे, श्री. दयाराम रामटेके, श्री. सुनील हटवार, श्री. धनराज पडोळे, श्री.गौतम राऊत, श्री. सुबोध हजारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन श्री. अशोक शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. सुनील हटवार यांनी केले.