चिचोली गावातील आदिवासी व दलितांना अमानुष मारहाण करणाऱ्या वनअधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करा :- राजु झोडे

46

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

चंद्रपूर:- सविस्तर वृत्त असे आहे की ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या चिचोली येथील दलित व आदिवासी निर्दोष नागरिकांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या वन अधिकारी व वन कर्मचारी यांची उच्चस्तरीय चौकशी करून यांचेवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.
चिचोली येथील केवळ शिकारीच्या संशयावरून वन विभागाचे अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी निरपराध नागरिकांना बेदम व अमानुषपणे मारहाण केली. अमानवीयतेचा कळस गाठून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पीडितांना विजेचे चटके गुप्तांगाला दिले. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. तरीही अजून पर्यंत प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची मोठी कारवाई केलेली नाही असे दिसून येत आहे. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांना जामीन मिळाला आहे. आठ ते नऊ वन कर्मचाऱ्यांनी अतिशय क्रूरतेची परिसीमा गाठली असून त्यांच्यावर दलित व आदिवासींना जाणीवपूर्वक मारहाण केल्याप्रकरणी ऍट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करावा व कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.
जर उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली नाही तर या विरोधात जिल्हाभरात तीव्र आंदोलन करणार असा इशारा राजु झोडे हनुमान आसुटकर सागर कातकर पियुस चांदेकर प्रविण साव सागर दहागांवकर ऋषभ साव आदि गावकऱ्यानी निवेदनाद्वारे देण्यात आला.