ग्रामीण रुग्णालयाचे रखडलेले काम पुन्हा होणार सुरू • आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश • घुग्गुस येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कामाकरीता 5 कोटी 26 लक्ष रुपयांचा निधी मंजुर

ग्रामीण रुग्णालयाचे रखडलेले काम पुन्हा होणार सुरू

• आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश
• घुग्गुस येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कामाकरीता 5 कोटी 26 लक्ष रुपयांचा निधी मंजुर

ग्रामीण रुग्णालयाचे रखडलेले काम पुन्हा होणार सुरू • आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश • घुग्गुस येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कामाकरीता 5 कोटी 26 लक्ष रुपयांचा निधी मंजुर

📱 मीडियावार्ता वृत्तसेवा

चंद्रपूर : 29 नोव्हेंबर
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दखल घेतली असून घुग्घुस येथील ग्रामीण रुग्णालयाच्या उर्वरित कामासाठी 5 कोटी 26 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या कामाला गती मिळणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस नगरपरिषद अंतर्गत नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने घुग्घूस येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले होते. याकरिता 10 कोटी 55 लक्ष रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून घुग्गुस ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरु करण्यात आले. मात्र शासनाचा निधी रखडल्यामुळे हे काम बंद पडले होते.
घुग्गुस शहर कोळसा खाण व वाहतूक, लोह शुद्धीकरण प्रकल्प यामुळे सर्वाधिक प्रदूषित क्षेत्र आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आरोग्याच्या भीषण समस्या जाणवत आहे. त्यामुळे निर्माणाधीन घुग्गुस ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता या रुग्णालयाच्या कामासाठी उर्वरित निधी मंजूर करावा अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना केली होती. या मागणीचा त्यांच्या वतीने सातत्याने पाठपूरावाही सुरु होता. अखेर त्यांच्या पाठपूराव्याला यश आले असून या विकासकामासाठी 5 काटी 26 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून या रुग्णालयाचे उर्वरित काम सुरु होणार असून 30 खाटांचे रुग्णालय लवकरच नागरिकांच्या सेवेत रुजु होणार आहे. या कामासाठी आणखी काही निधी लागणार असून त्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे आ. जोरगेवार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here