Home E-Paper श्री अनिल वेणूबाई रामदास मोरे यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न झाला.
श्री अनिल वेणूबाई रामदास मोरे यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न झाला.
भागवत जाधव
अलिबाग
८८०५०२२५६५
अलिबाग: श्री अनिल मोरे हे गृहपाल पदावर 19 जानेवारी 2022 पासून मुलांचे वस्तीगृह महाड येथे कार्यरत होते. यापूर्वी समाज कल्याण निरीक्षक पदावर त्यांनी काम पाहिले होते यांची कार्याची सुरुवात दोन डिसेंबर 1992 साली कनिष्ठ लिपिक म्हणून सुरुवात झाली होती.
त्यांचा सेवापुर्ती समारंभ सँडी हॉल अलिबाग येथे झाला या कार्यक्रमास त्यांचे वरिष्ठ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अलिबाग रायगड श्री सुनील जाधव यांच्या उपस्थित संपन्न झाला. सोबत त्यांचे मोठे बंधू सुनील मोरे उपस्थित होते.
या कार्यक्रमास त्यांचे जुने मित्र , परिवार व सहकारी आवर्जून हजेरी लावली साईनगर मित्रमंडळाचे उपाध्यक्ष श्री प्रल्हाद म्हात्रे व इतरांनी श्री अनिल मोरे यांचे तोंड भरून कौतुक केले त्यांचे उर्वरित आयुष्य सुखमय आनंदी जावो ही भावना सर्वांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात सौ .प्रणिता म्हात्रे उपसरपंच सौ वृंदा जाधव, सौ अस्मिता जाधव, सौ वर्षा पाटील श्री प्रवीण जाधव, श्री अभय पाटील व श्री. भागवत जाधव हजेरी लावली होती.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांच्या धर्मपत्नी सौ मनीषा मोरे प्रज्वल मोरे आणि मितेश मोरे मेहनत घेतली हा कार्यक्रम घरगुती व आटोप शिर ठेवण्यात आला होता कार्यक्रमाच्या शेवटी वाढदिवसाचा केक कापून व जेवणाचा कार्यक्रम करून समाप्त झाला.
कार्यक्रमाचे संचालन श्री थळे यांनी एकदम उत्कृष्टपणे केले होते.