रायगड मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी चे सर्वाधिक उमेदवार

27

रायगड मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी चे सर्वाधिक उमेदवार

दहा नगर पालिका मध्ये नगराध्यक्ष पदासाठी ३४उमेदवार ,नगरसेवकासाठी ५६२ जण रिंगणात

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्‍ह्यातील दहा नगर पालिकांच्‍या निवडणूकीत युती आघाडयांमध्‍ये फूट पडल्‍याने उमेदवारांची संख्‍या वाढली आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात उतरवले आहेत. यात नगरसेवक पदासाठी सर्वाधिक 136 उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे आहेत. तर नगराध्‍यक्ष पदासाठी राष्‍ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाने प्रत्‍येकी सात उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. या सर्व धामधुमीत अपक्ष उमेदवारांना फारशी संधी उरली नाही.

रायगड जिल्‍हयात शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, अजित पवारांची राष्‍ट्रवादी कॉंग्रेस, शरद पवारांची राष्‍ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शेतकरी कामगार पक्ष, कॉंग्रेस असे सर्वच प्रमुख पक्ष निवडणूकीच्‍या रिंगणात उतरले आहेत. यामध्‍ये शिवसेना शिंदे सर्वाधिक उमेदवार उभे करत आघाडीवर आहे.

रायगड जिल्‍ह्यात दहा नगरपालिकांच्‍या सार्वत्रिक निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. यात प्रत्‍येक नगरपालिकेत युती आघाडयांची समीकरणे वेगवेगळी आहेत. अनेक ठिकाणी युती आघाडयांमधील घटक पक्षांमध्‍ये एकमेकांशी पटत नाही तर काही ठिकाणी जागा वाटपात योग्‍य वाटा न मिळाल्‍याने घटक पक्ष एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत. 21 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्‍याचा दिवस होता. तोपर्यंत युती आघाडयांमधील घटक पक्षांमध्‍ये तडजोड होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. त्‍यामुळे उमेदवारांच्‍या संख्‍येत वाढ झाल्‍याचे पहायला मिळते. तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्‍याचा दिवस होता. तोपर्यंत युती आघाडयांमधील घटक पक्षांमध्‍ये तडजोड होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली.

दरवेळच्‍या निवडणूकीत अपक्षांचा मोठा भरणा असायचा. अपक्ष उमेदवार मात्र यावेळी परीस्थिती वेगळी आहे. शिवसेना आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेस हे दोन पक्ष फुटून दोन स्‍वतंत्र गट तयार झाले आहेत. त्‍यामुळे राजकीय पक्षाच्‍या तिकीटावर उभ्‍या असलेल्‍या उमेदवारांची संख्‍या वाढल्‍याने त्‍यांनीच जागा व्‍यापली आहे परीणामी अपक्षांना संधी कमी राहिली आहे. यावेळी 10 नगरपालिकांमध्‍ये नगराध्‍यक्ष पदासाठी केवळ आठ तर नगरसेवक पदासाठी 82 अपक्ष उमेदवार आपले भवितव्‍य अजमावत आहेत. खोपोलीत सर्वाधिक 35 जागा अपक्ष लढवत आहेत. त्‍या खालोखाल पेणमध्‍ये 22 जागांवर अपक्ष उभे आहेत तर अलिबागमध्‍ये सर्वात कमी म्‍हणजे केवळ एका जागेवर अपक्ष उमेदवार उभा आहे.

शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपाने सर्व दहा नगरपालिकांमध्‍ये आपले उमेदवार उभे केले आहेत राष्‍ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांनी आठ, कॉंग्रेस सात तर शेकाप आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने प्रत्‍येकी नगर पालिकांमध्‍ये कमी अधिक प्रमाणात आपले उमेदवार उभे केले आहेत.

——————————————————————

राजकीय पक्ष अध्‍यक्षपदाचे उमेदवार नगरसेवक पदाचे उमेदवार

शिवसेना ठाकरे गट 2 70

राष्‍ट्रवादी शरद पवार 2 10

राष्‍ट्रवादी अजित पवार 7 117

शिवसेना शिंदे गट 7 136

भाजप 4 88

कॉंग्रेस 2 25

शेकाप 2 34

अपक्ष 8 82