🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
मूल, 29 नोव्हेंबर : नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मूलच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. समता परिषदेचे चंद्रपूर पूर्व जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले यांनी आपल्या सहकार्यांसह आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून प्रवेश देण्यात आला.या घडामोडीने संपूर्ण शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.
प्रा. विजय लोनबले यांचेसह सिमाताई लोनबले, धनगर समाज अध्यक्ष नितेश मॅकलवार, सरपंच कालीदासजी खोब्रागडे, उपसरपंच योगेश लेनगुरे, उपसरपंच भारत वाळके, ज्योती इश्वर गुरूनुले, शालूताई माधव गुरूनुले, रूषीदेव नागोशे, वासुदेव नागोशे, सुनिल वसाके, नंदकिशोर बोरूले, प्रविण लोनबले, ठाकरदास लोनबले, विपुल वाढई, मुकेश लोनबले, वामन शेंडे, प्रविण रामटेके, संजय मांदाडे, अमित लोनबले, बालाजी भोयर, सुहास बावणे, भुषण लेनगुरे, तुषार लेनगुरे, संदीप पोहनकर यांनी आज भाजपात प्रवेश घेतला.
लोनबले यांच्या प्रवेशामुळे भाजपाला बहुजन समाजाचा मजबूत जनाधार मिळाल्याचे मानले जात असून, स्थानिक पातळीवर सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता अधिक दृढ झाली आहे.
• काँग्रेससमोरील आव्हाने वाढली आहेत.
लोनबले यांचा प्रवेश हा काँग्रेससाठी आणखी एक मोठा धक्का ठरत आहे. कारण यापूर्वीही प्रभाग 10 मधील तरुण नेते संदीप मोहबे यांनी उमेदवारीवरून नाराजी व्यक्त करत भाजपात प्रवेश केला होता. काँग्रेसने वेळेत उमेदवारी न देता अचानक आयात उमेदवाराला संधी दिल्याने मोहबे यांनी पक्षाचा त्याग केला होता.
ही घटना अद्याप शांत होण्याआधीच समता परिषदेच्या नाराजीने नव्या संकटाला तोंड फोडले आहे.
• प्रभाग 1 मध्ये बंड: काँग्रेसची अडचण वाढली
यावरूनही महत्त्वाचे म्हणजे प्रभाग क्रमांक 1 मध्ये काँग्रेसचे दोन बंडखोर उमेदवार रिंगणात आहेत. या बंडाळीमुळे अधिकृत उमेदवारांच्या अडचणीत भर पडत असून, मतविभाजनाची भीती काँग्रेसमध्ये वाढली आहे. यामुळे काँग्रेससमोर नेत्यांची नाराजी, स्थानिक पातळीवरील बंड, आयात उमेदवारांमुळे निर्माण झालेला असंतोष.असे तिहेरी आव्हान उभे राहिले आहे
सिमाताई लोनबले उमेदवारी—नाराजीचा केंद्रबिंदू
प्रा. विजय लोनबले यांच्या भाजप प्रवेशामागे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या पत्नी सिमाताई लोनबले यांना प्रभाग 7 मधून उमेदवारी देण्याची काँग्रेसची प्राथमिक मान्यता. मात्र अंतिम क्षणी उमेदवारी नाकारल्याने समता परिषदेत तीव्र असंतोष निर्माण झाला होता.ही नाराजी थेट भाजप प्रवेशात रूपांतरित झाली आहे.









