सावली (वाघ) गावा जवळ ऑटो रिक्षा आणी टिप्परच्या अपघात. 2 महिलाचा मृत्यू झाला तर 6 महिला जखमी.
मुकेश चौधरी
हिंगणघाट:- वरुन 6 किलो मिटर अंतरावर असलेल्या सावली (वाघ) गावा जवळ ऑटो रिक्षा आणी टिप्परच्या अपघात होऊन शेतमजूरी करिता जाणा-या एक महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दुस-या एका शेतमजूर महिलेचा सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवार 28 डिसेंबर ला सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली.
सर्वी कडे शेतात कापूस वेचणी आणी इतर शेतीची कामे सुरु आहे. मोठ्या प्रमाणात हिंगणघाट वरुन शेतक-यांद्वारा शेतीच्या कामा करिता मजूर नेण्यात येते. त्यामूळे सोमवारी सकाळी ऑटो रिक्षा मधून शेतमजूर महिला शेतात कामा करिता जात असतांना हा अपघात झाला. त्यात घटनास्थळी चिंधाबाई मारोती कातरे वय 50 वर्ष तर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु असतांना संगीता बबन कापटे वय 48 वर्ष दोन्ही मृत महिला संत चोखोबा वार्ड येथील रहिवासी आहेत.
ऑटो रिक्षा चालक पिंटु शेख वय 30 वर्ष यांच्यासह 9 शेतमजूर महिला ऑटो रिक्षाने हिंगणघाट येथून सेलू (मुरपाड) येथे शेतीत काम करायला निघाल्या. नंदोरी येथून चुरी घेऊन येणा-या एम.एच 32 एजे 2609 नंबरच्या टिप्परने एम.एच 32 सी 9614 नंबर असलेल्या ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यात ऑटो रिक्षामधिल शेतमजूर 2 महिलाचा मृत्यू झाला तर 6 महिला जखमी झाल्या. त्या सर्व सेलू मुरपाड येथील शेतकरी बोरकर यांच्या शेतात कापूस वेचायला जात होत्या.
या अपघातात ऑटो रिक्षा चालकाची काहीही चुक नसल्याचे लोकांकडुन माहिती मिळाली. त्यामूळे संतप्त नागरिकांनी टिप्पर ला आग लाऊन जाळून टाकला. पोलिस आल्यामुळे परिस्थीती नियंत्रणाखाली आली. सदर टिप्परचालक शेख जावेद नुरुद्दीन वय 36 वर्ष यास पोलिसांनी ताब्यात घेतले असुन पुढील तपास पोलिस करित आहे.