समुद्रपूर बिबट्याच्या हल्ल्यात गाय जखमी.

बिबट्याने पुन्हा जंगल क्षेत्र सोडून गावाकडील शेतशिवारात शिरकाव केल्याने शेतक-यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

समुद्रपूर:- अंतरगाव शिवारात बिबट्याने शिरकाव करून शेतात बांधून असलेल्या जनावरांवर हल्ला चढवीत एका जर्सी गायीला जखमी केले. ही 30 हजार रुपये कीमतीची जर्सी गाय शेतकरी गजानन ज्ञानेश्वर डाहाके रा. अंतरगाव यांच्या मालकीची आहे. मोहगाव जंगलातून पोथरा नाल्याने या बिबट्याने शिरकाव केला असून शिवणफळ, उंदीरगाव, अंतरगाव शिवारात या बिबट्याचे वास्तव्य आहे. या जंगलातून दिसेनासे झालेला बिबट्याने पुन्हा जंगल क्षेत्र सोडून गावाकडील शेतशिवारात शिरकाव केल्याने शेतक-यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या हा बिबट्या या शिवारातील 4 किलोमीटर परिसरात वावरतो. यातून शेतकरी शेतात कामाला जायलाही धास्तावत आहे.
या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी शेतक-यांनी मागणी केली आहे. घटनेची माहिती गजानन डाहाके यांनी वनविभागास दिल्यानंतर सहायक वनक्षेत्र अधिकारी विजय आडकिने, राजू दर्वे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here