हिंगणघाट शहरात फिरत आहे वीना नंबर प्लेट दुचाकी.

गांजा तस्करी, अवैध दारू तस्करी आणी मुलीची छेडखाणी करते वेळी पोलीसांना आणी मुलींना आणी नागरीकाना आपली ओळख पटू नये म्हणून हे मुल आपल्या दुचाकी वाहनांची नंबर प्लेट काढून ठेवतात

 

मुकेश चौधरी प्रतीनिधी
हिंगणघाट:– आज शहरात दिवसा गणित अवैध व्यवसायाला उत आल्याचे चित्र दिसून येत आहे. शरातील मघिल काही दिवसातील घटना वरुन दिसून येते की, हिंगणघाट शहरांमध्ये चोरी, डकैती, मर्डर, मुली व महीलाची छेडछाड, गांजा तस्करी, अवैध दारू तस्करी सारख्यां घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे दिसून येत आहे. आणी या सर्वामध्ये वीना नंबर असलेल्या दुचाकी वाहनाचा सरासपणे उपयोग केल्या जात असल्याचे दिसून येते.

प्राप्त माहितीनुसार आज हिंगणघाट शहरांमध्ये सरास पणे नंंबर प्लेट नसलेली दुचाकी वाहन फिरत असल्याचे दिसून येत आहे. हे वाहन अवैध धंदे, दारू तस्करी करणारे, गांजा तस्करी करणारे, शहरातील मुली आणी महिलाची छेडछाड करणा-यां मुलांची असल्याची माहिती शहरातील लोकांचे म्हणणे आहे.

गांजा तस्करी, अवैध दारू तस्करी आणी मुलीची छेडखाणी करते वेळी पोलीसांना आणी मुलींना आणी नागरीकाना आपली ओळख पटू नये म्हणून हे मुल आपल्या दुचाकी वाहनांची नंबर प्लेट काढून ठेवतात आणी वीना नंंबर प्लेट असलेली दुचाकी गाडी शहरात सरासपणे फिरवतात. काही लोकांनी अशी माहिती दिली की काही दुचाकी गाडी या चोरीचा असू शकतात. त्यांमुळे त्या दुचाकी वाहनांची नंबर प्लेट या चोरी करणा-या मुलांनी काढून ठेवल्याचे बोलले जात आहे.
हिंगणघाट पोलिस फक्त बघायचा भुमीकेत.
शहरात मोठ्या प्रमाणावर वीना नंबर प्लेट वाली अवैध दुचाकी वाहन फिरत असल्याचे सर्वीकडे दिसत असतांना, तरी हिंगणघाट पोलिस या वाहनवर कुठलीही करवाई करतांना दिसून येत नाही. त्यांमुळे असे वीना नंंबर प्लेट दुचाकी चालवणा-यां मुलांना हिंगणघाट पोलिसांची कुठलीही भीती उरली नसल्याचे दिसून येते.

स्वंघोषीत नेता आणी काही अवैध पत्रकारांचा अभय.
हिंगणघाट पोलिस विभागाने कधी अशा वीना नंंबर प्लेटवाल्या दुचाकी वाहनांवर करवाई केली तर, हिंगणघाट शहरांतील काही स्वंघोषीत नेता आणी अवैध पत्रकार पोलिस स्टेशनला जातात किंव्हा फोनच्या माध्यमातून अशा अवैध दारू तस्करांना, गांजा तस्करांना आणी मुलीची छेड काढणा-या मुलांची फैरवी करतात. त्यामुळे पोलिस अशा मुलांवर कुठलीही करवाई करत नाही त्यामूळे आज हिंगणघाट शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वीना नंंबर प्लेट वाली दुचाकी वाहन फिरताना दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here