कवी:गणेश रामदास निकम सर
चाळीसगाव गणेशपूर

चाळीसगाव गणेशपूर
तुमच्याच हाती आहे
तुमची सारी परिस्थिती
नियोजन करा योग्य
पाहून आपली आर्थिक स्थिती
वाढदिवस ऍनिव्हर्सरी यावर
घाला थोडाफार आळा
होणारा अतिरिक्त खर्च
आता विवेकाने टाळा
घरातच जेवण चांगले करून
हॉटेलच्या जेवणाला द्या सुटका
दारू बिडी सिगारेट आणि
टाळा जुगार किंवा मटका
ब्रँडेड कपडे ब्युटी पार्लर
याची करू नको सक्ती
भरमसाठ खर्चापासून
मिळवा सारे मुक्ती
लोक नातेवाईक यांची
सोडा मनातून सारी भीती
पैसा आपला वाचवून
करा स्वतःची प्रगती
पार्टी कल्चर च्या तुम्ही
लागू नका जास्त नादी
जीवनाचे सोने करा
राहणीमान ठेवून साधी
अंग झाकण्यासाठी फक्त
कपडालत्ता असतो ठीक
कर्ज करून देखावा नको
नाहीतर मागावी लागेल भीक
– कवी:गणेश रामदास निकम सर
चाळीसगाव गणेशपूर