महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथीलखेळाडूनि पुरस्कार प्राप्त करून सुवर्णपदक मिळवले

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694
बल्लारपूर : -गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथील खेळाडूंनी पुरस्कार प्राप्त करून सुवर्णपदक मिळविले .महाविद्यालयातील राकेश चोथले यांनी हँमर थ्रो मध्ये सुवर्णपदक प्राप्त करून प्रथम पुरस्कार मिळविला. त्याचप्रमाणे हरीश गोविंदुला याने द्वितीय पुरस्कार प्राप्त केला आणि रजत पदक मिळविले. प्रणाली वाढंरे नि 400 मीटर रनिंग मध्ये पुरस्कार प्राप्त केला. कोमल पेंदोर हिने हँमर थ्रो मध्ये तृतीय पुरस्कार प्राप्त केला. आणि कास्य पदक मिळविले. डिस्कस थ्रो मध्ये हरीश गोविंदुला याने डिस्कस थ्रो मध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त करून सुवर्णपदक मिळविले. प्रणाली वांढरे हीने डिस्कस थ्रो मध्ये द्वितीय पुरस्कार प्राप्त करुण स्थान मिळविले. त्याच प्रमाणे 400×400 मीटर रिले रेस मध्ये निखिल झाडे कार्तिक मोहुलै हरीश गोविंदुला कुणाल डांगे यांनी द्वितीय पुरस्कार प्राप्त करून रजत पदक मिळविले अशाप्रकारे महाविद्यालयातील एकूण दहा खेळाडूंनी सुवर्णपदक रजत पदक आणि कास्य पदक प्राप्त केले सर्वांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख कायरकर सर यांनी सगळ्यांचे अभिनंदन केले.