टीवी ९चे पत्रकार निलेश डहाट यांच्या वर हमला बल्लारपूरात महाराष्ट्र पत्रकार संघाने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694
चंद्रपूर :-सविस्तर वृत्त असे आहे की चंद्रपूर येथील दि.२८ डिसेंबर इंदिरानगर परिसरात टीव्ही ९चे पत्रकार निलेश डहाट यांच्यावर शिवसेनेचे युवासेना समन्वयक सहारे आणि पवन नगराळे या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी रात्रीच्या सुमारास अवैध धंद्याची आमची बातमी का लावली ,, असे बोलून त्यांच्यावर जीव घेना हमला केला. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज मंगळवारला महाराष्ट्र पत्रकार संघाने नगरपालिका चौकात तीव्र निषेध व्यक्त करून भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना तहसीलदार संजय
राईंचवार यांच्यामार्फत निवेदन देऊन हमले खोरांरावर कठोर कारवाई करून पत्रकारावरील कायद्याचे पालन करावे अशी विनंतीही करण्यात आली यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य पद्माकर जी पांढरे तालुका अध्यक्ष रमेश निषाद सदस्य प्रशांत भोरे पारीश मेश्राम सह महाराष्ट्र पत्रकार संघाचे सन्माननीय पदाधिकारी आणि सदस्य गण यांची यावेळी उपस्थिती होती