क्रीडा स्पर्धे सोबत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्याचे महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे युवकांना आवाहन
मा. महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते येणापुर येथे क्रिकेट स्पर्धचे उद्घाटन

मा. महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते येणापुर येथे क्रिकेट स्पर्धचे उद्घाटन
नंदलाल एस. कन्नाके
जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
गडचिरोली
*मिडिया वार्ता न्युज गडचिरोली*
*मो.नं. 7743989806*
चामोर्शी:// जीवन जगत असतांना अनेक प्रकारच्या स्पर्धा द्यावे लागतात. कुणी स्पर्धेत यश संपादन करतो तर कुणाला अपयश येत असते. तरी पण अपयश आले म्हणून खचून जाऊ नये. अपयशामागे यश दडलेले असते. जो स्पर्धेत टिकला तो जीवनात मोठा झाला. ह्याच गोष्टींचा बोध घेऊन आता युवकांनी स्पर्धेच्या माध्यमातून जीवन जगण्याचा आशय घ्या त्याच प्रमाणे क्रीडा स्पर्धांसोबतच युवकांनी पुढे येऊन आरोग्य शिबीराचे देखील आयोजन करावे असे मत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केले.
स्व.गंगाधर पत्तीवार व स्व.भगीरत पा.येलमुले यांच्या स्मृती प्रित्यर्थ येणापुर क्रिकेट लीग च्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमस्थळी अध्यक्ष म्हणुन डॉ.नामदेवजी किरसान प्रदेश महासचिव तथा जिल्हा निरीक्षक गडचिरोली, प्रमुख अतिथी म्हणून डॉ.नितीन कोडवते प्रदेश महासचिव, गोंडवाना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयंत येलमुले, सरपंच नीलकंठ पा.निखाडे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, अनुसुचित विभागाचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, माजी उपसरपंच निकेश गद्देवार, मुकेशभाऊ पत्तीवार, मनोरंजन हलदर, निनाद देठेकर, यादव मेश्राम, कोमल आक्केवार, आनंदराव पिदूरकर, वाकुडकर साहेब, पेंदाम सर, नागापुरे साहेब, दिलीप नेवारे, बाळभाऊ निखाडे, कुणाल ताजने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन मंडळाचे अध्यक्ष हर्षद बारसागडे, उपाध्यक्ष मुन्ना गोंगले, सचिव धनराज बोंमकंटीवार, कोषाध्यक्ष निखिल पत्तीवार, क्रीडाप्रमुख नागेश दंडीकर, व्यवस्थापक कामेश गोपावार, नाना बोडावार यांनी व यांच्या चमूने मिळून केले.