मधुमती शेलार यांना बहुजन जनता दलाकडून एक लाखाची मदत, पंडितभाऊ दाभाडे 

मीडियावार्ता

दि. २९, पुणे:  पुणे सातारा रोडवरील लक्ष्मीनारायण चौक येथील साईबाबा मंदिर शेजारी असलेल्या कर्णे हॉस्पिटल मध्ये उपचार घेणाऱ्या सातारा जिल्ह्यातील फलटण शिवाजी चौक पुतळा येथील मधुमती अनिल शेलार यांना बहुजन जनता दलाच्या कडुन एक लाख रुपयांची मदत मिळवून देण्यात आली असल्याचे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी सांगितले

   मधुमती अनिल शेलार यांच्या उजव्या पायावर (हिप रिप्लेसमेंट) हि शस्त्रक्रिया करण्यात येणार होती या शस्त्रक्रियेला डॉ नारायण कर्णे सर यांनी दोन लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे मधुमती शेलार यांना सांगितले असताना मधुमती शेलार यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मधुमती शेलार यांना शस्त्रक्रियेवर खर्च करणे अपेक्षित होते शेलार यांनी आपल्याकडील असलेले पुंजी रक्कम एक लाख रुपये कर्णे हॉस्पिटल मध्ये डिपॉझिट भरून दि ९/११/२०२२ रोजी ऍडमिट झाल्या मधुमती शेलार यांच्या नातेवाईकांनी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्याशी संपर्क करून मधुमती शेलार यांच्या उजव्या पायावरच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीची याचना केली बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी संदर्भातील मधुमती मधुमती शेलार यांच्या कागदपत्राची जुळवाजुळवी करून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अवघ्या आठ दिवसाच्या आत मधुमती शेलार यांना शस्त्रक्रियेवर उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कार्यालयाकडून बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी एक लाख रुपयाची मदत मिळवून दिली.

 ‌‌ मधुमती शेलार यांच्या उजव्या पायावर हिप रिप्लेसमेंट हि शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या मुळे ‌ मधुमती शेलार यांनी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे साहेब आणि डॉ नारायण कर्णे सर आभार मानले असे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार द्वारे सांगितले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here