Home latest News ऋषभ पतंच्या कारचा उत्तराखंडातील रुडकी येथे भीषण अपघात, जखमी ऋषभ पंत रुग्णालयात...

ऋषभ पतंच्या कारचा उत्तराखंडातील रुडकी येथे भीषण अपघात, जखमी ऋषभ पंत रुग्णालयात दाखल…

138

ऋषभ पतंच्या कारचा उत्तराखंडातील रुडकी येथे भीषण अपघात, जखमी ऋषभ पंत रुग्णालयात दाखल…

हिरामण गोरेगावकर 

३० डिसेंबर, दिल्ली: भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारचा हिमाचल प्रदेश मधील रूडकी जिल्ह्यात झाला भीषण अपघात. जखमी ऋषभ पंतला उपचारासाठी डेहराडूनला रुग्णालयात आणण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार ऋषभ पंत याची BMW गाडी रस्त्यावरील डीव्हायडरवर आदळून पेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ऋषभ पंत याच्या पाठ आणि डोक्याला मार लागला असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

ऋषभ पंतचे हा उत्तराखंड राज्यातील असून सुट्टीनिमित्त तो आपल्या घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. अपघातस्थळी उपस्थित असलेल्यानीं दिलेल्या माहितीनुसार गाडीने पेट घेतल्यानंतर ऋषभ पंत गाडीची काच फोडून बाहेर पडला. दरम्यान त्याचा गुडघा, पाठ आणि डोक्याला दुखापत झाल्याचे प्राथमिक तपासणीमध्ये दिसून आले आहे.