'File a case of fraud against the energy minister' Maharashtra Navnirman Sena.
'File a case of fraud against the energy minister' Maharashtra Navnirman Sena.

‘ऊर्जामंत्र्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा’ महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

पिंपरी:- लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ व सवलत देण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र, अचानक सरसकट वीजबिल भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असा फतवा त्यांनी काढला. त्यामुळे वीजग्राहकांची फसवणूक झाली. या फसवणूक मंत्र्यावर तातडीने फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शहर मनसेने पोलिसांकडे केली आहे. मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दिघी-वडमुखवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे.

या वेळी अंकुश तापकीर, उपशहराध्यक्ष राजू सावळे, विशाल मानकरी, सचिव राहुल जाधव, विभागाध्यक्ष दत्ता देवतरसे, संतोष यादव, दिग्विजय गवस, हेमंत तिवारी, प्रतिक शिंदे, सुधीर भालेराव, आकाश मोहिते, अभिजीत शिगंले, मयूर हजारे, रवी जाधव, आबा कापसे, गणेश लोणारी, तुषार बनसोडे, दत्ता धर्म, तानाजी चोरमले, विशाल ओव्हाळ व भोसरी विधानसभेतील प्रभाग अध्यक्ष व उपविभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here