श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय येथे माहात्मा गांधी पुण्यतिथी.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी
वडनेर:- श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेऊन त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तमराव पारेकर होते. यावेळी प्राचर्यानी महात्मा गांधीचे व्यक्तिमत्व आणि विचार यावरती आपले विचार मांडून त्यांचे विचार आजच्या संदर्भात कसे महत्वपूर्ण आणि उपयुक्त आहेत हे सांगितले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यानी महात्मा गांधीच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक समितीचे समन्वयक डॉ .प्रवीण कारंजकर यांनी केले या कार्यक्रमाला डॉ.नरेश भोयर, डॉ.विनोद मुडे, डॉ. विठ्ठल घिणमिने, डॉ.गणेश बहदे, प्रा.नितेश तेलहांडे, प्रा.पंकज मुन, प्रा.संजय दिवेकर, प्रा. आरती देशमुख, शंकरराव कापसे, संजयराव पर्वत, अरुण तिमांडे, सुरेश तेलतुमडे, विजायलक्ष्मी जारोंडे आदी उपस्थित होते.