लोहिया विद्यालय सौन्दड येथे हुतात्मा दिन साजरा.
टी. बी सातकर प्रतिनिधी
गोंदीया :- जिल्हातील सौन्दड येथिल रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सौन्दड येथे दिनांक 30 जानेवारी 2021 ला ‘हुतात्मा दिन’ साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्राचार्य मधूसुदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे, पर्यवेक्षिका सौ. कल्पना काळे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी दोन मिनिटांचे मौन ठेऊन देशातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.