शाहीनबाग आंदोलनाच्या धर्तीवर वंचित बहुजन आघाडीचे किसानबाग आंदोलनाचे आयोजन.

47

शाहीनबाग आंदोलनाच्या धर्तीवर वंचित बहुजन आघाडीचे किसानबाग आंदोलनाचे आयोजन.

 Organizing Kisanbagh movement of deprived Bahujan Aghadi on the lines of Shahinbagh movement.

Organizing Kisanbagh movement of deprived Bahujan Aghadi on the lines of Shahinbagh movement.

पुणे:- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशानुसार पक्षातील मुस्लिम पदाधिकारी व कार्यर्त्यांच्या नैतृत्वात देशाची राजधानी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम समाज बांधवांचा पाठिंबा व समर्थन दर्शवण्यासाठी शाहीनबाग आंदोलनाच्या धर्तीवर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी बुधवार दिनांक 27 जानेवारी 2021 सकाळी 10:00 ते सायंकाळी 06:00 पर्यंत एक दिवसीय किसानबाग आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्रातील आर. एस. एस. प्रणित (R.S.S)भाजपा चे सरकार सत्तेत आल्यापासुन लोकसभा व राज्यसभेतील पाशवी बहुमताचा वापर व जनमताचा अनादर करून सातत्याने येथील बहुसंख्य जनतेचे व विविध वंचित समुह घटकांचे शोषण करणारे त्यांचे अस्तित्व संपवुन त्यांच्यात धार्मिक तेढ निर्माण करणारे,भांडवलदार धार्जिणे काळे कायदे करीत आहे. नुकतेच पारित करण्यात आलेले तीन कृषी कायदे देखील याचाच भाग असुन भांडवलदार धार्जिण्या असणाऱ्या या काळ्या कायद्याच्या माध्यमातुन या देशातील बळीराजाचे शोषण होऊन केवळ भांडवलदारांचे हित साधले जाणार आहे.. या कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड असंतोष असुन मागील 4 महिन्यांपासून देशातील शेतकरी व नागरिक हे कायदे रद्द करून यात संशोधन करण्याची मागणी करीत असताना शासन हुकूमशाही पद्धतीने त्यांच्या जनमताला दाबुन टाकण्याचा प्रयत्न सत्तेच्या माध्यमातुन करीत आहे. सत्तेचा दुरुपयोग करून या आंदोलनाला धार्मिक रंग देत हे आंदोलन विशिष्ट एका धार्मिक समाजाचे असल्याचा आरोप करून माध्यमांच्या माध्यमातुन तसा प्रचार करीत देशात अराजकता माजवन्याचा व त्या माध्यमातुन देशातील लोकशाही संपुष्टात आणुन हुकूमशाही प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न हे सरकार करीत आहे.

या सरकारचे हे छुपे मनसुबे हाणून पाडण्यासाठी तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे येथील भूमीपुत्रांचे,बळीराजाच्या हक्क व अधिकारांचे आंदोलन आहे व या आंदोलनाला या देशातील तमाम समाज घटकांसह महाराष्ट्रातील मुस्लिम समाज बांधवांचे जाहीर समर्थन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व मुस्लिम पदाधिकरी व कार्यकर्ते तसेच पिंपरी चिंचवड शहरातील तमाम मुस्लिम बांधवांच्या नैतृत्वात हे काळे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी किसानबाग आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या आंदोलनात शहरातील विविध मुस्लिम संघटनांसह बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी व इतर अल्प संख्याक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.ज्या मध्ये जमाते इस्लामी हिंद, जमियाते उल्मा ए हिंद, कुल जमाते तंजिम,जमियाते उल्मा ए हिंद, मिनारा मुस्लिम जमात,गुरू गोविंदसिंग गुरुद्वारा कमिटी, नंदीबैल तिरुमल समाज, भटके विमुक्त समाज संघटना, ओप्लांगल फौंडेशन, वीरांगणा सोशल फौंडेशन, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद सामाजिक विकास संस्था व भारतीय बौद्ध महासभे सारख्या अल्पसंख्याक संघटना व त्यांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
सदर आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड. धनराज वंजारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन केले. या वेळी महाराष्ट्र महासचिव अनिल जाधव, राज्याचे नेते सर्वजीत बनसोडे,वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे प्रमुख उपस्थिती म्हणुन उपस्थित होते. यांच्या सह महासचिव रहीम सय्यद, नगरसेवक अंकुश कानडी, वंचित बहुजन महिला आघाडी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा लता रोकडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे संतोष जोगदंड, कार्याध्यक्ष सुहास देशमुख,के. डी. वाघमारे,कोषाध्यक्ष राजेश बारसागडे,शहर कार्यकारीणी सदस्य राजन नायर, बाबुराव फुलमाळी, कमलेश वाळके, धनंजय कांबळे,बबन सरोदे, किरण हिंगणे, बिरुदेव मोटे, महिला महासचिव सुधा रायन, शारदा बनसोडे, गौरी शेलार,निर्मला कांबळे, सुलक्षणा रायन,प्रियंका घुगे, चंद्रकांत लोंढे, राजेंद्र साळवे, चंद्रकांत गायकवाड, एम. डी. वाघमोरे, अमोल कांबळे, गजेंद्र कांबळे, प्रशांत बचुटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.