आर. टी. आय कॉम्पुटर अँड टेकनिकल इन्स्टिट्यूट वडनेर येथे महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी.
प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी
वडनेर:- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी वडनेर येथे साजरी करण्यात आली. वडनेर येथील युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्था व नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आर. टी. आय कॉम्पुटर अँड टेकनिकल इन्स्टिट्यूट वडणेर येथे महात्मा गांधी यांची पुण्यतिथीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांस सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरती बोरकर प्रमुख अतिथी नेहरू युवा केंद्राचे तालुका स्वयंसेवक सचिन महाजन, शिक्षिका विभा गुरनुले, मीनल जारोंडे, वैभव कामडी, पूजा रघाटाटे, समीक्षा महाकाळकर, मयुरी वरभे, युगावधरा गुढदे, मनीषा जयश्री वांढरे, वैष्णवी तिजारे, प्रीती पंढरे, तेजस्वी साथपुथे व विद्यार्थी उपस्थिती होती.