अकार्यक्षम तहसीलदार चौधरी यांची बदली करा :भा.ज.पा ब्रम्हपुरी
महसूल मंत्री (म.रा), खासदार अशोक नेते यांना प्रा.सुयोग बाळबुधे यांचे निवेदन
✍क्रिष्णा वैद्य✍
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9544462500
ब्रम्हपुरी :- मागील काही महिन्यापासून ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये, तहसीलदार श्रीमती उषा चौधरी मॅडम तहसीलदार पदाचा कार्यभार सांभाळत आहेत मात्र त्यांच्या कार्यकाळात तालुक्यातील महसूल प्रशासनावर कुठलाही प्रभाव दिसून येत नसल्याने ब्रह्मपुरी तालुक्यात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन, दिवसाढवळ्या सर्रासपणे रेती चोरी दरम्यान भरधाव वाहनाने होणारे अपघात, तहसील कार्यालयात घुसखोरीचे प्रकार, कनिष्ठ महसूल कर्मचाऱ्यांची बिनधास्तपणा व सर्वसामान्य नागरिकांशी असभ्य वागणूक तर महसूल प्रशासनामुळे ब्रह्मपुरी तालुक्याबाबत वारंवार वृत्तपत्रात प्रकाशित होणारे बदनामीकारक मजकूर अशा विविध कारणांमुळे शहराची प्रतिमा मागील काही महिन्यापासून डागाळलेली असल्याचे निवेदनाद्वारे प्रा सुयोग बाळबूधे यांनी तक्रार केली आहे.
तालुक्यातील घाट लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याने तालुका महसूल प्रशासनाकडून काही महिन्यापासून अवास्तव, भरधावं व निर्भीडपणे रेती चोरीचे प्रमाण वाढले असून त्याचीच प्रचिती रणमोचन फाट्यावरील भीषण अपघातावरून तालुक्याला आलेली आहे तर असे बरेच अपघात तालुक्यात घडत आहेत. तहसील कार्यालयामध्ये रेती तस्करांचा वावर दिसून येत आहे मात्र सर्वसामान्य नागरिक तहसीलदार यांना भेटण्यासाठी कार्यालयाचे उंभरटे झीजवतांना दिसून येत आहेत प्रसंगी तहसीलदार यांच्या असहकार व असभ्य वर्तणुकीने आमरण उपोषण सुद्धा तालुक्यात घडलेले आहेत.
ब्रह्मपुरी शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा,तहसीलदार उषा चौधरी मॅडम यांच्या अकार्यक्षम व नियोजन शून्य कार्यप्रणालीमुळे त्यांची ब्रह्मपुरी तालुक्यातून लवकरात लवकर बदलीची मागणी करीत असून तालुक्याला एक कार्यक्षम अधिकारी देण्यात यावा अशा आशयाचे निवेदन महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र, सुधीर भाऊ मुनगंटीवार, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरी तर्फे प्रा सुयोग बाळबूधे यांनी मागणी केली आहे.